नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, September 30, 2023

स्वच्छांजली


 स्वच्छांजली:- 📝

१/१०/२३ 


मुख्य पक्षाच्या कार्यालयाबाहेर मोठा कार्यक्रम ठरला होता. पक्षाचे सर्व  नेते ते सामान्य कार्यकर्ते यांना निरोप गेले.

कमळाच्या आकाराचा मोठ्ठा हौद बांधला होता. वाॅशिंग पावडर 'कमळा' ची गाणी होती, ठिक ठिकाणी जहिराती होत्या.


कार्यक्रमाची सुरवात प्रार्थनेने झाली. इतर पक्षातून नुकत्याच योग्य टायमवार आलेल्या एका समूहाने प्रार्थना म्हणली


*दे दी हमे आझादी, सारा बचाके काला माल*

*स्वच्छता के विश्वगुरु कर दिया कमाल*


असं म्हणून ते सारे हौदा कडे डुबकी मारायला जायला लागले  त्याचवेळी एक उद््घोषणा झाली.

मित्रो, हा हौद नव्या आलेल्या लोकांसाठी नाही. त्यांना तर आम्ही आधीच डुबवले आहे.

आज पक्षांतील सर्व जुन्या नेत्यां पासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत डुबकी मारुन स्वत:ला स्वयंसिद्ध करायचे आहे


डुबकी मारलेल्या सर्वांना

 'स्वच्छांजली ' प्रमाणपत्र घरपोच पोचवण्याची जबाबदारी इतर अराजकीय स्वयंसेवकांवर सोपवली आहे. ते तुमच्या घरी योग्य प्रकारे पोचतीलच


असे म्हणून तो आवाज 'डुबूक ' आवाज काढण्यासाठी हौदाकडे गेला आणि मागे समर्थकांची रांग लागली

🌷🌷🌷🌷🌷🌷


#स्वच्छांजली

poetrymazi.blogspot.com

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...