आमची रोजची ठाणे लोकल सिवूड नंतर नेरुळ च्या आधी ट्रॅक बदलून हार्बर लाईन वरुन ट्रान्स हार्बर मार्गावर येते
हा ट्रँक बदलायला मदत करणारा सिग्नल मधील रंग म्हणजे पिवळा.
लाल आणि हिरव्या पेक्षा थोडा दुर्लक्षित पण योग्य वेळी योग्य मार्ग दाखवणारा. संयमित मार्गक्रमण करण्यास मदत करणारा आणि क्षणार्धात लाल,हिरव्यात लुप्त होणारा
जीवन सुंदर आहे फक्त हे हे 'यलो' सिग्नल पार करुन योग्य ट्रॅक पकडता आला पाहिजे 😊
वरची हार्बर लाइनची लोकल सावकाश जेंव्हा ट्रान्स-हार्बरवर पूर्णपणे वळली की गार्ड ड्रायव्हरला विशिष्ठ हाॅर्न देऊन "आँल इज वेल" असे कळवतो
इकडे आपण आपलेच गार्ड आणि ड्रायव्हर . जेंव्हा एखादा नवीन विचार/ मार्ग/ दिनक्रमात बदल करताना योग्य नियोजन, अभ्यास करुन मार्गस्थ होताना आपणच आपल्याला इंडिकेशन द्यायचे आणि गुणगुणायचे
कैसे जादुगर हैं बहार के ये दिन |
जान ही न ले ले खुमार के ये दिन |
जीने नहीं पाऊँगा,
हाय मर जाऊँगा,
ऐसे न मारो नज़ारा मुझे |
'येल्लो'जी सनम हम आ गये, आज फिर दिल ले के 💛
अमोल 📝
अश्विन शु. चतुर्थी
२९/०९/२२
No comments:
Post a Comment