' उडती बस ' ते ही पुण्यात ही संकल्पनाच इतकी आवडली की बस 😬
'उडत्या बसी' मधूनी देशी
ट्रँफिकला आधार
पुणेकरा, तू खरा झुंजार
लाल हिरवा सिग्नल सारा
तुच मिसळशी सर्व पसारा
'आकाशच' मग ये आकारा
तुझ्या मतांच्या खंबीरतेला नसे अंत ना पार
पुणेकरा, तू खरा झुंजार
पेठापेठांचे रुप आगळे
प्रत्येकाचे स्टाँप वेगळे
तुझ्याविना ते कोणा न कळे
कुणी जाई काळभोर-लोणी,कुणी उतरे शनीपार
पुणेकरा, तू खरा झुंजार
तुच घडविशी तुच फोडीशी
कुरवाळीशी तू, तुच तोडीशी
न कळे यातून कशी 'उड'विशी
देसी सेवा परी निर्मिल्या मेट्रोपुढे अंधार
पुणेकरा, तू खरा झुंजार
उडत्या बसी' मधूनी देशी
ट्रँफिकला आधार
पुणेकरा, तू खरा झुंजार
📝 ०४/०९/२२
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment