या दिवाळी खरेदीत मी काय शिकलो
कुणाला ही कमी लेखू नका.
फुटपाथवरच्या विक्रेत्याकडे मी खरेदी केलेल्या वस्तूचे बिल देताना ( दिवाळीची खरेदी फूटपाथवरुन?नक्की काय घेतले? वगैरे प्रश्ण नकोत. फूटपाथ, लोकल मधील खरेदीचे मोल मुंबई / ठाणे/ नवी मुंबईकरच जाणतात) दोन तीन दा मोबाईल वर कोड स्कॅन केला तरी कनेक्ट होत नव्हतं
काय भाऊ ( actually भय्या हा शब्द वापरला होता असे स्मरते) problem दिसतोय तुमच्या कोड मधे
त्यावर आमच्या भावाने ( प्रति भैय्याने) जे सांगितले त्याला तोड नाही
म्हणाला मोबाईल flight मोड वर टाका, नंतर परत flight मोड काढा
मग बघा,
लगेच कामं झालं
तात्पर्य, कुणाला कमी लेखू नका, प्रत्यक्ष विमान प्रवास न करणाऱ्याला ( क्षणभर गृहीत धरून ) flight मोडचा उपयोग कसा करावा हे जास्त चांगले समजते 😷
टिप:
मंडळी , तुमची खरेदी झाली असेल तर हे वर्क होतयं का हे बघायला गेला नाहीत तरी चालेल. अजून बरंच दिवाळं आपलं दिवाळ्या बघायच्या आहेत. पुढल्या वर्षी ( किंवा पुढच्या खरेदीला) मात्र हे लक्षात ठेवा 😁
अमोल 📝
२०/१०/२२
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment