हर्षदा सुंठणकर यांनी थिम दिली ,मग पुढचा पूल उडवायला जास्त वेळ लागला नाही
चांदण्यात फिरताना का रे केलास घात?
अभियंत्या भेट रे तू पुढच्या चौकात
होता तो एकटाच
खंबीर असा हायवेवर
दूर तिथे 'कळ'दाबे
आपटले दातावर
हे इथले खड्डेपण, आता सारे जाणतात
(अभियंत्या भेट रे तू पुढच्या चौकात)
सांग कसा त्याच्याविना
पार करु पुनवपूर?
सुसाट वारा घोंगावतो
आले खेड-शिवापूर
ब्रेक आता 'मारुकंस' ! क्लच माझा पारआत!
अभियंत्या भेट रे तू पुढच्या चौकात
चांदण्यात फिरताना का रे केलास घात?
अभियंत्या भेट रे तू पुढच्या चौकात
( चौकातील ) अमोल 📝
०२/१०/२२
#माझी_टवाळखोरी
No comments:
Post a Comment