आमचा ' एक्सिट पोल'
मंडळी सुप्रभात 🏻
काल पासून आपण निवडणूक निकालाबाबत अनेक पोल वाचत आहोत. नाही नाही मी ही तुम्हाला माझा अंदाज वगैरे सांगणार नाही आहे. पण हा ' एक्सिट पोल' मला भूतकाळात घेऊन गेला आणी या एक्सिट पोलचे बीज आम्हाला आमच्या शाळेच्या प्रत्येक परीक्षेत दिसून येऊ लागले
येतय का लक्षात?
साधारण कुठल्याही इयत्तेची सहामाही, वार्षिक परिक्षा हा एक्सिट पोल साठी सुगीचा काळ
मराठी, इंग्रजी, गणित हे आमच्यासाठी कायमचे राखीव मतदार संघ. इथला पोल घ्यायच्या भानगडीत आम्ही कधीच पडलो नाही
इतिहास, भूगोल, शास्त्र हे आमचे पारंपारिक मतदारसंघ
रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा याची परिक्षा संपल्यानंतर ठराविक मित्र पँनेल कडून मिळणाऱ्या उत्तरावर आमचे मार्कांच्या अंदाजांचे पोल ठरले जायचे.
रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा याची परिक्षा संपल्यानंतर ठराविक मित्र पँनेल कडून मिळणाऱ्या उत्तरावर आमचे मार्कांच्या अंदाजांचे पोल ठरले जायचे.
एखाद्या अवघड प्रश्णांच्या उत्तरासाठी कधी कधी एकदम हुशार तज्ञ मित्राशी विचारविनिमय ( expert panel) केला जायचा. अर्थात माझ्यासाठी तसा प्रसंग क्वचित यायचा. नाही नाही मी हुषार म्हणून नव्हे तर असा प्रश्ण कायम आपला option लाच असायचा.
तर घरी जाऊन पुढच्या पेपराच्या अभ्यासा आधी ४-ते ५ वेळा तरी वेगवेगळ्या permutation, आणी combination ने या पेपरात आपल्याला किती मार्क मिळणार आहेत याचा अंदाज बांधणे हा आमच्यासाठी एक आनंददायी exit pol च होता
आणी ही सगळी तयारी असायची घरच्या, 'आई-बाबा चणाक्ष नातेवाईक' सर्वेला सामोरा जायच्या आधीची. या सर्वेक्षण नुसार आम्ही कधीच विजयी उमेदवार ठरत नसायचो.
एक मात्र नक्की कितीही सर्वे आले गेले, या सगळ्यात निवडणूक आयोगाने ( प्रती शाळेने) आमचे कधीच डिपाँझीट जप्त होऊ दिले नाही
सर्व परीक्षा प्रेमी आणी त्यानंतरच्या होणाऱ्या ' एक्सिट पोलला' समर्पित 🏻
अमोल
१५/१२/१७
१५/१२/१७
No comments:
Post a Comment