संयमाचा अंत होणे म्हणजे काय असते हे टुकार कविता वाचून नाही तर सलग सुट्टीच्या दिवशी हायवेवर प्रवास करुनच कळते
मुंबई - पुणे मेगा हायवे एकंदर परिस्थिती
( चाल: तळव्यावर मेंदीचा अजूनी रंग ओला)
हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बों(ब)ला
माझी गाडी लेन घेते जिथे घोटाळा
दाबिलेस पायाने एक ब्रेक क्षणे
बट हळवी रांगेतील वाजविती कर्णे
नकळत हळू हळू टोल नाका आला
( हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बोला)
घाटातुनी शितलता दाटुनी आली
दोन गाड्यांची प्रेमभरे टक्कर झाली
आसमंत प्रदुषणे धुंद धुंद झाला
( हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बोला)
हा टुकार अडकला घाट खंडाळ्यात
मिटुनी काच लावून एसी शब्द सुचतात
मागचा सहप्रवासी वाचून धन्य झाला
(हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बोला)
📝त्रासलेला टुकार प्रवासी
२४/१२/१७
मुळ गाणे:-
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा
गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे
बट हळवी वाऱ्यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला
पवनातुनी शीतलता दाटुनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे धुंद धुंद झाला
ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटुनी पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला
No comments:
Post a Comment