( काल्पनिक / प्रासंगिक * )
विंदांची माफी मागून
दगडुशेठच्या भेटी,विश्वगुरु आला
तो जाहला सोहळा,(पुण्य) नगरीत
जाहली दोघांची, मंदिरात भेट
मन की बात , दोघांमध्ये
बाप्पा म्हणे,गुरु तुझे कर्म थोर
अवघेची पुरस्कार घेणे केले
विश्वगुरु म्हणे , एक ते राहिले
"स्व"राज्य न जाहले, महा-राष्ट्रावरी
बाप्पा म्हणे, बाबा ते ना बरे केले
त्याने तडे गेले पक्षा पक्षात
अंकल अट्टल, त्याची रीत न्यारी
बळकावुनी खाती, येऊनिया
विश्वगुरु म्हणे, तुझ्या आशीर्वादाने
तरून जाईल, भक्त माझा
बाप्पा म्हणे, गड्या वृथा शब्दपीट
प्रतेकाची वाट , वेगळाली
वेगळीये वाटे, वेगळाले काटे
काट्यासंगे भेटे,पुन्हा तोच
ऐक ऐक वाजे
घंटा ही मंदिरी
असंतोषाचे जनक ,वाट पाहे
गुरु निघोनिया, गेले एक दिशा
कवतुक सदा-शिवी,आवरेना ! !
अमोल 📝
०१/०८/२३
No comments:
Post a Comment