#सावधान
आज डोंबिवलीत एका वधू-वर मेळाव्यास उपस्थित राहिलो. लेटेस्ट ट्रेन्ड काय चालला आहे हे बघायला मिळाले. पूर्वी वेस्टनच्या मुली सेंट्रल चा मुलगा पसंत करीत नसत.
आज या विचाराचे अँप अपग्रेड झालेले बघितले
चक्क डोंबिवली (पूर्व) च्या मुली डोंबिवली (पश्चिम) ला जात नाहीत असं एका मुलाची आई खेदाने सांगत होती.
नशीब हा ट्रेन्ड आत्ता सुरु झाला. आमच्याकाळात सांगलीत असा काही विचार नव्हता. असता तर, 'नाही हं ! मला साखर कारखान्यावरचा मुलगा अजिबात नको,गुलमोहर काँलनीतलाच पाहिजे फारतर विश्रामबाग परिसरातील चालेल असं सांगून आमची केस त्याचवेळी रिजेक्ट झाली असती.
एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मंगळ, एक- नाड, सगोत्र या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत किंवा तसा विचार सुरु झालाय
असो.
मेळाव्याचे आयोजक माझे साडूच होते. त्यांच्यामुळे माझ्या कार्याची म्हणजे पत्रिका बघणे वगैरेची अनायसे जहिरात झाली.
आता त्यांचा पुढचा मेळावा १६ जुलैला पुण्यात आहे तर पुण्यातील ज्या मुलींना कोथरूड/बावधनहून सहकारनगरला जायचे नाही, विमाननगरहून पाषाणला यायचे नाही त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी पुण्यात आहे एवढेच सांगतो.😬
शेवटी तमाम लग्नाळू वधू -वरांचे २,७ ( आणि साडू-साडूंचे ११वे स्थान) अँक्टीवेट होऊन, "शुभ_मंगल" होवो याच यानिमित्याने शुभेच्छा
💐💐
#स्वप्नपुर्ती_विवाह_मंडळ_पुणे
#माझी_टवाळखोरी 📝
२/०७/२३
No comments:
Post a Comment