" काहीपण देगा देवा '
ज्योतिष शास्त्रासंबंधीत ' व्यवसाय जातक' नावाचे एक पुस्तक वाचनात आहे. यात 'सुखवस्तू' लोकांचे ग्रहयोग दिले आहेत. थोडक्यात खूप काही Ambitious नसलेले , आहे त्यात समाधानी, फारशी रिस्क न घेणारे, परंपरेने आलेला व्यवसाय चालवणारे, मुळ गाव न सोडणारे इ इ लोक्स या वर्गीकरणात येतात. यांच्या पत्रिकेतील ग्रहांचे नाते एकमेकांशी गुण्या- गोविंदाचे असते. उगाच कोण वक्री नसतो, एकमेकांशी स्फोटक केमिस्ट्री नसते , शुभ ग्रह खूप चांगले नसतात, पापग्रह खूप त्रास देत नाहीत.दशा ही फारशा वाईट नसतात. जन्म, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, संतती, निवृत्ती, वृधत्व हे चक्र व्यवस्थित पार पडते.
अँडजेस्मेंट,फ्लेक्झिबलपणा त्यांच्या रक्तात असतो. पत्रिकेतील बहुसंख्य ग्रह द्विस्वभाव राशीं संबंधित असतात.
त्यामुळे त्यांचा विशेष काही आग्रह नसतो
थोडक्यात जातकाला आणि ज्योतिषांनाही फारसा ताप न देणारी यांची पत्रिका असते.
" काहीपण " चालेल हे यांच्या जीवनाचे सूत्र.
आज नाष्टयाला काय करायचे असे घरी विचारले गेले(च) तर - "काहीपण" हेच उत्तर ब-याचदा त्यांच्याकडून येते
फिरायला कुठे जायचे - कुठेही, सिनेमा कुठला बघायचा - कुठलाही हीच वृत्ती ते कायम ठेवतात.
उद्या हे मंत्री झाले आणि खातेवाटपाच्या वेळीही फारशी किरकिर न करता 'काहीपण' चालेल (पण द्या )ही भूमिका ठेवतील.
अशा व्यक्तींसाठी तुकोबांची रचना वेगळ्या शब्दात
काहीपण देगा देवा
पोहे,मॅगी ,उपमा!
जया अंगी 'काही'पण
तया यातना कठीण !
महापूरे झाडेजाती
तेथे 'काहीपण' वाचती!
#काहीपण_देगा_देवा
#माझी_टवाळखोरी 📝
०७/०७/२३
No comments:
Post a Comment