नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, July 9, 2023

दो दिवाने शहर में


 दो दिवाने शहर में


मंडळी सध्या सोशल मिडियावर एका आजी-अजोबांचा 'रिम- झीम गिरे सावन ' या गाण्यावरचा एक व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे ( तो इतका  प्रसिध्द झाला आहे की यू ट्यूबवर हे गाणे सर्च केले असता मुळ गाण्याच्या आधी हा व्हिडिओ येतोय )


अफलातून क्रिएटीव्हिटी यांची.  गाण्यातील हिरो - हिराॅईन तसेच हे आजी- अजोबा.मुळ गाण्यातील ठिकाणे, अभिनय , बॅकग्राउंडला येणा-या टँक्सी, बेस्ट बसेस जसंच्या तसं घेण्याचा चांगला प्रयत्न केलाय. छान वाटतं बघून.  हे सगळं शूट करणाऱ्या टिमला आमच्याकडून पैकीच्या पैकी गुण.


या रिलची मोहिनी अनेकांना पडली आहे असे काल आमच्या लक्षात आले. खारघरला गोल्फ कोर्स च्या बाजूच्या डोंगरलाईन मधून रस्त्यावरून पडणाऱ्या धबधब्यांसह अनेक अमिताभ आणि स्मिता रस्त्यावर पडून 'आज रपट जाये तो हमें ना उ.ठा.ओ' म्हणत पोरांकडून रिल्स बनवून घेत होते. त्याचवेळी एका कपलने माझ्या कडून छत्री घेऊन,  दुस-या एका कपलची मुलं उसनी घेऊन राज- नर्गीस स्टाईलने "फिर भी रहेगी निशानीयाँ" यावर रिटेक वर रिटेक घेत रिल बनवणे चालू  ठेवले होते.


हे सगळं पाहून आपण का मागं रहायचं?  आपण पण असं काहीतरी मुंबईत जाऊन करु म्हणून आमच्या राणी ला बोललो.

अर्थात तत्काळ नकार देत म्हणाली तुम्हाला सांगितलयं ना मी की जुलै महिन्यात मी मुंबईत जाणार नाही. केंव्हा कुठे अडकू सांगता येणार नाही.


शेवटचा उपाय म्हणून मी  विचारलं?


"आती क्या खंडाळा?"


सध्या ती राणी मुखर्जी सारखं हसण्याचा सराव करतीय आणि मी काड्यापेटीचा बाॅक्स आणलाय 


चेतावणी: या रिल्सच्या शूटिंगमुळे येत्या शनि/ रविवारी लोणावळा/खंडाळ्यात ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. आपापल्या जबाबदारीवर येणे


#अरे_घुमेंगे_फिरेंगे_नाचेंगे_गाऐंगे

#ऐश_करेंगे_और_क्या?


( आणि अशारीतीने आम्हाला त्यापुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या शाळेतील मित्रांच्या गेट- टू -गेदरला घरून परवानगी मिळाली ☺️)


#माझी_(मान्सून)_टवाळखोरी 📝☔

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...