नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, August 28, 2011

हवामान खाते


येत्या चोविस तासात मुसळधार पाऊस पडेल !
असे जेंव्हा हवामान खाते म्हणेल !
तेंव्हाच मी गणपतीच्या खरेदीला
सहकुटुंब बाहेर पडेन  !!!

Wednesday, August 24, 2011

अहिंसा


चर्चेच्या गुर्‍हाळ्यात
प्रश्न काही सुटला नाही
आता कळले अहिंसेचा मार्ग
वाटतो तेवढा सोपा नाही

Tuesday, August 23, 2011

फस्ट्रेशन


आरक्षण गुंडाळले
करप्शनवर काम सुरु झाले
पॅशन  ' प्रकाश झां' ची
फस्ट्रेशन आम्हास आले

Monday, August 22, 2011

व्हाईट वॉश


खालील ग्राफीटीचा फळा नुकताच इंग्लन्डहून एकदम स्वस्तात पांढर्‍या रंगाने रंगवून  आणला आहे.  रंग अजून ओला अस्ल्याने काही दिवस लिखाण करायला जमणार नाही त्या बद्दल क्षमस्व

लोकपाल


आमचा कोणाला विरोध नाही !
'वंदे मातरम' म्हणणारच !!
हजारो संकटे झेलीत अण्णा !
लोकपाल विधेयक आणणारच !!

Sunday, August 21, 2011

खिडकी



Friday, August 19, 2011

मावळचे पाणी



'जो हुआ, वो गलत हुआ'
युवराजांची वाणी !
तरी आमच्या मावळला
मिळालेनाही  पाणी !

अमोल केळकर
२० ऑगस्ट २०११

आरक्षण


आरक्षणाचा मुद्दा
चर्चेतून बाजूला काढला
सिनेमाच्या गल्ल्याने मात्र
कोटीचा पैसा कमवला

अमोल केळकर
१९ ऑगस्ट २०११

Thursday, August 18, 2011

रामलीला


                              भ्रष्ट नेते, सुस्त सरकार!
नित्य घोटाळे  चव्हाट्यावर !
इतिहास नवा रचू आता !
रामलिलेच्या मैदानावर !!

अमोल केळकर
                            १९ ऑगस्ट २०११

Wednesday, August 17, 2011

अंतीम सामना


टिम इंडीयाने खरे म्हणजे
टिम अण्णांपासून शिकावे
प्रबळ इच्छाशक्तीने
साहेबांशी नडावे
सचिननेही सहजतेने
शंभरावे शतक करावे
पण काहीही असो सर्वांनी
पाचही दिवस खेळावे

अमोल केळकर
१८ ऑगस्ट २०११

Monday, August 1, 2011

अस्तित्व


आज परत आपण !
मुळ अस्तित्व दाखवले !
पाच दिवसाच्या कसोटीला !
चार दिवसात गमावले !!

अमोल केळकर

माझी आरोळी - दिनांक - २ ऑगष्ट २०११
संदर्भ -भारतीय संघाला इंग्लण्ड बरोबर दुसर्‍या कसोटीत ४ थ्याच दिवशी स्विकाराव लागलेला पराभव

आदर्श - कमळ


' आदर्श ' दाखवणारे !
स्वतःही चुकू लागले !
काळ्या खाणीत तेंव्हा !
' कमळ' फुलू लागले !!!

माझी आरोळी - दिनांक - २ ऑगष्ट २०११
संदर्भ - भाजपचे कर्नाटकातील मुख्यमंत्र्याना ' खाणीच्या  भ्रष्टाचार'  प्रकरणी खुर्ची सोडावी लागली
Related Posts Plugin for WordPress, Blogger...