नक्की केंव्हा सुरुवात झाली माहित नाही पण गेले अनेक वर्षांपासून २६ जानेवारी ( आणि १५ आॅगस्ट) निमित्य केल्या जाणाऱ्या गोड पदार्थात 'जिलबी' ने अगदी मानाचे स्थान पटकावले आहे यात शंका नाही.
जात, पात, धर्म , गरिबी, श्रीमंती याचे कुठलेच बंधन न ठेवणारी ही जिलबी.
आमच्या इकडे बेलापूरला तिला आणताना तिचा मोठ्ठा भाऊ पंजाबच्या सामोसाला ही घरी आणायची पध्दत आहे. पण जिलबी खायची खरी मजा आम्ही घेतली ती सांगली मधील ( त्यातही मिरजेतील) अनेक मंगल कार्यालयात. अगदी
गो-यांपासून, ख-यांपर्यत कुठल्याही कार्यालयात पंगतीत वाढली जाणारी गरमागरम , स्वर्गीय चविची जिलबी आणि सोबतीला तिचा थंडगार पण जरा मठ्ठ मित्र म्हणजेच मठ्ठा. ( इथे मठ्ठ्याला ताक म्हणणे म्हणजे भयंकर अघटीत गोष्ट समजावी) ह्या जोडी शिवाय अनेक वर्षे सांगली/ मिरज ( आणि इतर शहरातलीही) येथील अनेक मंगल कार्य झालीच नाहीत. एकंदर लग्नाची व्यवस्था, जेवण आणि स्पेशली या जोडी साठी मुलगा/ मुलगी दुस-या गावचे पण लग्न सांगली/मिरजेत झालेली उदाहरणे प्रत्यक्ष पाहिली आहेत.
जेवायला जेंव्हा आम्हाला वेगळं बसवायला लागले ( आई/ बाबा, काका/ काकू, मोठा भाऊ/ बहिण यांच्या पाना शिवाय )तेंव्हा आम्ही ख-या अर्थाने ' खायच्या वयात ' आलो. हळूहळू पंगत कशी अंगीकारायची हे ही जमू लागले
एखाद्या मंगल कार्यात जेवायला बसल्यावर सवयीने सुरवातीचा पांढरा भात, नंतरचा मसाला भात किती घायचा हे समजायला लागले. मग मसाला भाताच्या मागून जिलबीचे ताट घेऊन येणारे काका/ दादा दिसले की पटकन मसाला भाताचा राहिलेला घास कसाबसा गिळून , बाजूच्या कोशिंबीरीचा ओघळ बाजूस करुन ,येणाऱ्या जिलबीला खास जागा जरुन देणे हा जेवणाच्या कार्यक्रमातील एक महत्वाचा घटक असायचा. आपल्या ताटात १-२ जिलब्या वाढून पुढे गेलेल्या काकांना, ओ अजून एक वाढा न असं सांगून १-२ अधिक जिलब्या ताटात पाडून घेतल्यावर एखादं युध्द जिंकल्याच फिलींग यायचे.
अर्थात पंगतीत एकावेळी १-२ ताटं जिलब्यांचा लिलया पडशा पाडणा-या जून्या सांगलीकर/ मिरजकरांशी मात्र बरोबरी करणे कधीच शक्य नव्हते
काळ बदलला. मंगल कार्यालयात जिलबीला अनेक पर्यायी गोड पदार्थ आलेत. आता तर अशी वेळ आली आहे की ' जिलबी ' पक्वान्न ठेवणे म्हणजे काहीतरी वेगळी ( स्पेशल) गोष्ट केलीय. पंगत जाऊन स्वत: स्वतःसाठी वाढून घेणे आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे ते शूगर फ्री जिलबी, डायट जिलबी इत्यादी इत्यादी
तरीपण या जिलबी बद्दलचा लळा, जिव्हाळा कायम राहिलच 😋
📝(जिलबी प्रेमी) अमोल
poetrymazi.blogspot.in
२६/०१/२०२०

No comments:
Post a Comment