ज्या निकालाची तीस देशांनी नोंद घेतली त्यावर आजची #रविवारची_टवाळखोरी
दादांनो, ताईंनो, काकांनो, काकूंनो
तेरी भी चूप, मेरी भी चूप
कुणाला काही सांगू नका
कबूल?
"कसबा राजा" ऐट दावतो
गुपित जपलंय रे..
कुणी माझ्या मतात लपलयं रे
कुणी माझ्या मतात लपलयं रे
ते दिसले, अन आम्ही पाहिले
पाहिले परि ते सा-यांने
डोळ्यात इशारे हसले
हसले ते मोठ्या तो-याने
हे कसे न त्याला कळले
कळले आता नि-कालाने
'मत' न पडले, मन न जुळले
थोडं ( ? ) चुकलं रे
कुणी माझ्या मतात लपलयं रे
कुणी माझ्या मतात लपलयं रे
तो भाव 'मताचा ' दिसला
दिसला मग 'संशय' कसला?
हा नखरा का मग फसला
फसला हा अल्लड चाळा
पेठेत बहाणा असला?
बसला उमेदवार तो भोळा
प्रीत अशी परी रीत अशी का?
कोडं सुटलयं रे
कुणी माझ्या मनात लपलयं रे
कुणी माझ्या मनात लपलयं रे
#माझी_टवाळखोरी 📝
०५/०३/२०२३
poetrymazi.blogspot.com
1 comment:
मराठीत खूप छान कविता...कृपया तुमची सर्जनशीलता चालू ठेवा.कवितेतून तुम्ही व्यक्त करू शकता असा भरपूर आशय आहे. कृपया महाराष्ट्राच्या सद्य परिस्थितीवर राजकीय व्यंगचित्रावर कविता लिहा.
Sanjay Shinde 8087633202
Post a Comment