'फडतूस' आणि 'काडतूस' *
( * प्रासंगिक मनोरंजन हा हेतू)
राजकारणी लोकांनी या दोन शब्दांना वलय प्राप्त करुन दिले असले तरी लहानपणापासून सांगली सारख्या गावात या शब्दांचा मुक्त वापर आम्ही मित्र-मंडळी करायचो
आजच्या सारखे भरमसाट सिनेमे नसताना आणि त्याचे रिव्ह्यू / रेटींग नसताना एखादा सिनेमा बघून आलोय हे कळल्यावर दुस-या दिवशी शाळेत जाताना चर्चा व्हायची,
'कसा आहे रे सिनेमा ' ?
( तो सिनेमा चांगला/ बरा असला तरी ठरलेले उत्तर )
फडतूस रे, एकदम फडतूस.
अजिबात बघू नकोस.
थर्ड क्लास हा शब्द आम्ही मित्र वापरतच नसू कारण याचा कुठेतरी संबंध डिग्रीशी ( पोलिसी/ शैक्शणीक योग्य वाटेल तसे घेणे ) येत होता, आणि आपलं पितळं उघडं पडेल याची तेंव्हा भिती मनात वाटायची
त्यामुळे फडतूस हा शब्दच फिट्ट होता
फडतूस सिनेमातील दृश्यांचे वर्णन ऐकत / ऐकवत जेंव्हा आमचा घोळका शाळेजवळ यायचा तेंव्हा तिथले जनता जनरल स्टोअर्स बघून अचानक एका मित्राची ट्यूब पेटायची आणि म्हणायचा,
अरं, काल मी मसाला गोळ्या घ्यायला पैसे दिलेले की लेका तुला,
आता 'फडतूस' सिनेमा ठेव बाजूला,मसाल्याच्या गोळ्या खिशातून ' काडतूस' का नाहीस सांग
किती त्या फडतूस शिनेमावर चर्चा करायलाय ☺️
#माझी_टवाळखोरी 📝
०५/०४/२३
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment