क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...
Sunday, September 28, 2014
Friday, September 26, 2014
राजकीय चित्र
विरोधकांना जवळ करून
दूर लोटले मित्र
महाराष्ट्रात सगळीकडे
हेच आहे चित्र
अमोल केळकर
सप्टेंबर २७, २०१४
Thursday, September 25, 2014
ढोकळा फाफडा V झुणका भाकर
आम्हाला नको , ढोकळा फाफडा
बरी आमची झुणका भाकर
तिखट लागली फारच तर
तोंडीला घेऊ गोड गोड साखर
अमोल केळकर
सप्टेंबर २६, २०१४
Tuesday, September 23, 2014
मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)
यशस्वी झाली मॉम
'क्युरिऑसिटी ने केले अभिनंदन
भारतीय शास्त्रज्ञानो
तुम्हास आमचे सादर वंदन
amol kelkar
sep 25, 2014
चटक मटक
इतकी लागली चटक
की विसरले गेले
आजूबाजूचे घटक
अमोल केळकर
सप्टेंबर २३, २०१४
Monday, September 22, 2014
स्वतंत्र जागा
चार ओळींच्या मेळाव्यात
शब्दांनी मागितल्या स्वतंत्र जागा
सर्वांना मग एकत्र गुंफून
तयार झाला सुंदर धागा
अमोल केळकर
सप्टेंबर २३, २०१४
मऊ
युती होण्यासाठी
व्हा थोडे मऊ
तरच दोघे मिळून
विधानसभेत जाऊ
त्यासाठी तुम्ही
व्हा थोडे उदार
तरच तुम्हाला उघडेल
मंत्रालयाचे दार
सप्टेंबर २२, २०१४
अमोल केळकर
Sunday, September 21, 2014
लाट
लाट मिळाली आहे
धुळीला !!
हेच कळत नाही आहे
कमलाबाई खुळीला !!
( स्वतंत्र संघटना ) अमोल केळकर
सप्टेंबर २०१४, २२
Saturday, September 20, 2014
' पोरखेळ'
' यु' म्हणाला ' ती ' ला
चल पाहू सिनेमा ' पोरखेळ'
निदान यानिमित्याने का होईना
सत्कारणी लागेल आपला वेळ
अमोल केळकर
सप्टेंबर २०, २०१४
Friday, September 19, 2014
प्रस्ताव
दरवेळेला पाठवायचे
नव नवीन प्रस्ताव
मीच मोठा भाऊ म्हणत
आणायचा उसना आव
अमोल केळकर
सप्टेंबर १९,२०१४
Thursday, September 18, 2014
स्वबळ
अंबाबाईच्या दर्शनाला
नेत्यांचा आला पूर
प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो
आमचेच नेते 'शूर'
प्रचाराचा नारळ फोडून
स्वबाळाची सुरु भाषा
आम्हीच येणार जिंकून
सगळ्यांना वेडी आशा
Wednesday, September 17, 2014
रामदास
निवडणूक आली की
आठवतात ' राम, दास '
बाकी सर्व काळ
आवळायचा फक्त फास
अमोल केळकर
सप्टेंबर १८, २०१४
निवडणूक
युती आघाडी बनवताना
नेत्यांचा चाललाय तोल
आहे त्या जागा घेऊन येतोस
का स्वबळ आजमवायचे बोल
अमोल केळकर
१७ सप्टेंबर २०१४
Monday, September 15, 2014
२८८ चे गणित
इतिहासाचा तास ( त्रास ) सुरु झाला . लिमये मास्तर वर्गात आले. त्यांच्या हातातील बीजगणीताचे पुस्तक पाहून वर्गातील पोरांना जरा आश्चर्यच वाटले . अर्थात दोन्ही विषय लिमये मास्तरच शिकवत असल्याने तसा काही प्रश्ण नव्हता.
आल्या आल्या मास्तरांनी पोरांना सांगितले , मला कल्पना आहे इतिहासाचा तास आहे पण मी तुम्हाला आत्ता एक गणित घालणार आहे.
लिहून घ्या गणित
एका टोपलीत २८८ आंबे आहेत . यातील ' अ ' ग्रुपला १३५ आंबे पाहिजे आहेत, ' ब ' ला किमान १५० आंबे पाहिजे आहेत . ' क ' ग्रुपने सांगितले आहे की आम्हाला दोन अंकी आंबे पाहिजेतच नाहीतर आम्ही वेगळा विचार करू , ' ड ' चे असे म्हणणे आहे की त्यांनी स्वतंत्र पणे आंबे वेचायचे ठरवले तर त्यांच्या वाट्याला ५ तरी नक्की येतील , ' ई ' आम्हाला जर का मना सारखे आंबे मिळाले नाहीत तर आम्ही ही पिकणार नाही इतरांनाही नासवू
मुलांनो तर सांगा ' अ , ब, क, ड, ई ला किती आंबे मिळतील
गणित सोडवतानाची गृहीतके : -
१) या आंब्याचा एकत्र आमरस करून वाटून घ्यावा असे फालतू उत्तर नको
२) या टोपलीत असलेले आंबे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा , विदर्भ येथून आणून एकत्र मुंबईत भरलेले आहेत , वाटणी करताना या सर्व आब्यांचा विभागवार विचार केला नाही तरी चालेल
३) यात सर्व जातीचे ( हापूस, पायरी, रावळ , तोतापुरी ) आंबे आहेत. वाटणी करताना याचाही वेगळा विचार करायची आवश्यकता नाही
४) नासके आंबे टोपलीतून बाद ठरवू नयेत
याचे उत्तर तुम्ही मला पुढील गणिताच्या तासापर्यंत द्यायचे आहे . हे उत्तर तुम्ही स्वत: , किंवा २-४ जणांच्या ग्रुपने मिळून दिलेत तरी चालेल. जो कोणी अचूक उत्तर देईल त्याला किंवा त्या ग्रुपमधील एकाला मी वर्ग सेक्रेटरी करणार आहे.
चला बरं लागा कामाला…
लिमये सरांचा हुकूम सुटताच चिंटू , बंड्या, गोट्या लगेच कामाला लागले. यावेळेला तरी वर्गाचे सेक्रेटरीपद मिळायला पाहिजे यावर ते ठाम होते. वर्गातल्या त्यातल्या त्यात हुषार राजू ने ' एकाला ' चलो ची भूमिका घेऊन उत्तर शोधून ठेवायचे आणि वेळ्प्रसंगी इतर ग्रुपला मदत करून निदान उपसेक्रेटरी पदतरी मिळवायचे असा विचार केला. एका ' विनोदी ' स्वभावाच्या मुलाने आपला मोर्चा सरळ हुशार मुलींकडे वळवला आणि यावेळचे सेक्रेटरीपद मुलींमधूनच असं ठणकावून सांगितलं .
वर्गातील एका ' दादा' विद्यार्थाने डायरेक्ट त्याच्याहून ५ वर्ष मोठ्या असलेल्या भावाला ' विचारायचे ठरवले कारण त्याला पक्की खात्री होती की ५ वर्शापुर्वी लिमये सरांनी हाच प्रश्ण 'मोठ्या भावाच्या' वर्गातही विचारला असणार .
अशारीतीने सर्वजण आपापल्या पध्दतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले
लक्ष फक्त एकाच होतं
वर्गाचा सेक्रेटरी बनणे .
( क्रमश : )
संकल्पना : अमोल केळकर
Friday, September 12, 2014
Friday, July 4, 2014
Thursday, June 19, 2014
(फुटबॉल फिक्सिंग )
आता म्हणू नका इथेही
होऊ शकते लेन देन
जेंव्हा बाहेर पडले
चिली कडून स्पेन
गतविजेत्या संघाने
घरची धरली वाट
खेळ हा पाहून
सारे पडले चाट
अमोल केळकर १९ जून २०१४
होऊ शकते लेन देन
जेंव्हा बाहेर पडले
चिली कडून स्पेन
गतविजेत्या संघाने
घरची धरली वाट
खेळ हा पाहून
सारे पडले चाट
अमोल केळकर १९ जून २०१४
Wednesday, June 18, 2014
फुट्बॉल फेवर ( २)
रात्र रात्र जागून जर
बरोबरीत सुटणार असेल सामना
फुटबॉल प्रेमींची मग
कशी पुर्ण होईल मनोकामना
Sunday, June 1, 2014
सोन्यासारखी संधी
एकीकडे रोष , दुसरीकडे जल्लोष
तिसरीकडे आहे नाराजी'
हीच सोन्यासारखी संधी त्यांना
जे करतात हाजी ! हाजी ! हाजी !
जून २, २०१४
Subscribe to:
Posts (Atom)



