नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, June 5, 2016

छाता दिसे कुणाला


७ जून म्हणजे रवीचा ' मृग' नक्षत्र प्रवेश ठरलेला,

 त्याचा आधी आमची लगबग नेहमीचीच
( चाल: काटा रुते कुणाला)


छाता दिसे कुणाला शोधीत आज कोणी
मज छिद्र ही दिसावे हा वर्षायोग आहे

पाहू तरी कळेना कळ आतल्या दांड्याची
गंजलेल्या ता-यांचा मज शाप आज आहे

तरी उघडू पहातो निघतोच विंचू तेथे
माझे उघडणेही विपरीत होत आहे!

हा घोळ, संपेना की छत्रीही उघडेना
टाकुनी दारामागे मी  भिजणार मस्त आहे

©अमोल केळकर
-----------------------------------------
मुळ गाणे:  -

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे !

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !

हा स्‍नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !

*******************************

Tuesday, May 24, 2016

वाघ का सिंह


वाघाचे संपले आता 
सिंहाचे येणार राज
निवडणुकी पूर्वी  नेत्यांना 
सुटते म्हणे अशी खाज 

२४/५/१६ 

Tuesday, May 17, 2016

नीट


प्रिय राजकारणी नेत्यांनो,

पुढील निवडणूकीत
हव्या असतील ' सिट'
तर वेळीच चर्चा करुन
गुंता सोडवा   ' निट '

अमोल
१८/५/१६

Tuesday, May 3, 2016

एक झिंगाट विडंबन -आज सैराट मेसेज आला


एक  झिंगाट विडंबन  
( चाल :  आज आनंदी आनंद झाला )



किती सांगू मी सांगू कुणाला

आज   सैराट  मेसेज आला 
जात मोडू  चला, वर्ण  उधळू चला

आला आला र पर्शा आला


झिंगाट  गाणे ग  सगळ्यांच्या ओठी शब्दही भरकटले 
पोर पोरी रांगेत, झाली मग तर्राट,  थेटर थरथरले
पर्शा दिसतो उठून, आर्ची आली  नटून
नव्या सिनिमाचा  भंगार केला



वय  अशी कोवळी  ग, खांद्यावरी ओढणी ,  संगास हो कुसंगती
कुणी म्हणे बालक , कुणी म्हणे पालक, मंजुळ नावे किती
रोज वेळ पाहून , थेटरात जमून
सांजसकाळी कल्लोळ  केला 


खेळ मग  रंगला ग, लिहिणारा  दमला, मेसेजवर मेसेज पडे
लपुन छपुन नेटकरी , मारतो ग पिचकारी, लेखांचे  पडती सडे
होई पुरता हसा , आता नको फसा 
टाईमपासाचा अतिरेक झाला 

अमोल ४/५/१६ 
---------------------------------------------------------------------------------------
मुळ गाणे :

किती सांगू मी सांगू कुणाला

आज आनंदीआनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग कान्हा आला



अष्टमिच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला



मूर्ति अशी साजिरी ग, ओठांवरी बासरी, भुलले सुरांसंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून
सांजसकाळी गोपाळकाला



खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे
लपुन छपुन गिरिधारी, मारतो ग पिचकारी, रंगांचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगांच्या धारांत न्हाला

Wednesday, April 6, 2016

ग्रुप सोडू नको


WHATSAPP   वरचे अनेक ग्रुप , त्यात होणारी

Monday, March 7, 2016

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


शनी झाला आता शंकर 
तरीही  होईना तृप्ती … 

देवेंद्रा आता तूच सांग 
या महिलांना नामी युक्ती 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 

अमोल 
८/३/१६

Friday, February 26, 2016

मराठी भाषा दिवस


' मराठी भाषा दिवस ' 

हार्दिक शुभेच्छा 

' सुप्रभात ते शुभ रात्री '
आज देऊ फक्त 
मराठीची खात्री 

मराठी तुमची जर माय 
तर फेसबुक , व्हाट्सप वर 
मराठीत का नाव नाय ?

मुंबई असो वा सांगली 
मराठी भाषा 
खुप  खु प चांगली 

कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन 


Wednesday, February 24, 2016

रात्रीस खेळ चाले


' रात्रीस खेळ चाले'  या मूर्ख मालिकांचा  
जाईल ना कसा मग  हा वेळ  शाहण्यांचा 

रिमोट ना  स्वयंभू  हातात लागतो हा 
जाहिरात लागताच बदलत  राहतो हा 
भेटीस राही  साक्षी हा दूत माणसांचा 
संपेल ना तरीही हा वेळ  शाहण्यांचा

लागाताच ब्रेक इथे, गिळतो मी एक घास 
पिताच घोट  पाणी टीव्हीत दिसते सास 
'भांडतात सौख्यभरे ' ना दोष 'अस्मितेचा ' 
संपेल ना तरीही हा वेळ  शाहण्यांचा

या रोजच्या मालिकाना का बसलो मी झेलीत 
आठवून  सर्व घटना झोपलो मी त्या खोलीत 
विसरलो सूर आपुल्या त्या  धुंद जीवनाचा
संपेल ना तरीही हा वेळ  शाहण्यांचा। 

अमोल 
----------------------------------------------
मुळ गाणे : 
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचा

आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा

या साजिर्‍या क्षणाला का आसवें दिठीत
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा

Saturday, January 30, 2016

दर्शन दे रे, शनी भगवंता





शनी देवाची माफी मागून : - 🙏🏼📝
( चाल: दर्शन दे रे, दे रे भगवंता)


दर्शन दे रे, शनी भगवंता
तुझ्या चौथा-याचा सोडव तुच गुंता!!

तृप्ती देती जाता शिर्डीही साईची !
भक्ती नेच पुढे वाट शिंगणापुरची !
जाऊ दे महिलांना पाहिजे तिथे आता !!

दर्शन दे रे, शनी भगवंता , तुझ्या चौथा-याचा सोडव तुच गुंता !!
ऐकताच वाणी समस्त महिलांची !
मती गुंग झाली इथे आचा-यांची !
आठविशी मग तू साडे - साती येता !!

 दर्शन दे रे, शनी भगवंता , तुझ्या चौथा-याचा सोडव तूच गुंता !!
संकल्पना : 📝अमोल🙏🏼

Tuesday, December 22, 2015

शेपटीवाल्या प्राण्यांची


तुम्हाला माहितच आहे खुप पूर्वी जंगलात  शेपटीवाल्या प्राण्यांची सभा  भरली होती.
आता सध्याच्या आधुनिक जंगलात ही परत सभा झाली, काय झालं त्या सभेत ऎकायचंय?
ऎका

शेपटीवाल्या प्राण्यांची परत भरली सभा,
पोपट झाला अँडमीन अन मधोमध उभा.
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो,
देवाघरची लूट, देवाघरची लूट !
तुम्हां-आम्हां सर्वांना " व्हाट्स अपचा ग्रुप"
या ' ग्रुपचे 'कराल काय ?"

गाय म्हणाली, "अश्शा, तश्या मेसेजने मी वाढवीन आशा."

घोडा म्हणाला, "ध्यानात ठेवीनन, ध्यानात ठेवीन
मीही माझ्या मेसेजने, असेच करीन, असेच करीन,"

कुत्रा म्हणाला, "खुशीत येईन तेव्हा, स्माईली पाठवीत जाईन"

मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेव्हा ग्रुपच सोडीन, ग्रुपवर सोडीन"

खार म्हणाली, "मिळेल संधी तेव्हा माझ्या मेसेजची मलाच बंडी."

माकड म्हणाले, "कधी फाँर्वड, कधी एडीट, मेसेजची मी उडवीन खिल्ली"

मासा म्हणाला, "मेसेज म्हणजे जीव की प्राण , जीव की प्राण
वाचत  राहीन प्रवासात, वाचत राहीन प्रवासात."☺

कांगारू म्हणाले, "माझे काय ?"
"तुझे काय ? हा हा हा !
" मेसेज" म्हणजे कळतंच नाय."

मोर म्हणाला, "एक एक मेसेज धरीन, मी धरीन
उपदेशाचे डोस छान मी देईन."

पोपट म्हणाला, "छान छान छान !
देवाच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या ' ग्रुपचा 'उपयोग करा."

"नाही तर काय होईल ?"

"दोन पायाच्या माणसांगत, प्राण्यांचा ग्रुप भांडत राहील."

"जंगलातील मैत्रीचे अनोखे पर्व, सोबतीला प्राणी सर्व "

काल्पनिक
संकल्पना : अमोल केळकर 

Thursday, December 17, 2015

बाजी


झाली असेल तुमची जर
असहीष्णूवरची  काव काव
लक्ष द्या दिलवाले  इकडे
 बाजी आम्हीच जिंकणार राव

अमोल केळकर
१८/१२/१५

Monday, November 23, 2015

पिंगा


(काल्पनिक )
कुठे तो महाभारतातला संजय ज्याने आपल्या दूरदृष्टीने  रणांगणावरची इत्यंभूत माहिती धुतराष्ट्राला दिली आणि कुठे हा कलीयुगातला संजय जो अगदी लीलया इतिहास बदलून रुपेरी पडद्यावर दाखवण्याचा अट्टहास करत आहे.. . 
आज जर  विश्रामपूरचे राजे असते ( बरोबर कट्यार वाले …. )  आणि म्हणाले असते , 
उठा कविराज अमोल , ही घ्या लेखणी ,  एक चारोळी  माफ तुम्हाला . होऊन जाउद्या , अशी  चारोळी  करा की काळजात घुसली पाहिजे :)

होय सरकार …ही घ्या…। 

काशीबाई म्हणाली मस्तानीला 
वाड्यात घालू दोघीजणी  पिंगा  
नाहीतर बाजीराव मागत बसतील 
त्यांच्या आवडत्या भाजक्या शेंगा  

वाट बघत काशीबाईंची 
मस्तानी राहिली बसून 
संजय भन्सालीच्या  पिंगाने 
लोकांनी घेतले हसून

:) :) :) :) 

Saturday, October 24, 2015

बाई अन राम


जीवनात ज्यांना काही 
उरले नाही काम 
त्यांचा मुखी नित्य 
शांताबाई अन शांताराम 

अमोल
२४/१०/१५

Tuesday, October 20, 2015

चला हवा येऊ द्या


 " चला हवा येऊ द्या "मधे , आले होते कवी 
चार ओळी मागे लागल्या , तुलाही  यायला हवी 

सगळ्यांना बरोबर घेऊन मी  पाहिले रंगबिरंगी कोट 
बघूया आता याने तरी  भरेल का आपले पोट 


( शिकावू  कवी )  अमोल  केळकर 
२१/१०/२०१५


Saturday, May 30, 2015

तनू वेड्स मनू



तनू वेड्स मनू . . 

सगळा भारत . . 

आनंदलाय

जणू . 

Sunday, May 24, 2015

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो माझा ....सिनेमा कुणी पाहिला....


आज मी एक सिनेमा पाहिला
" अगं बाई! "
अरे यात 'अगं बाई 'करण्यासारखे काय आहे, हो आणी मराठी सिनेमा होता तो .
"अरेच्या "!
अरे, म्हणजे काय? मराठी माणूस आहे, मराठी सिनेमा पाहणारच की
आणी आता त्यावर माझे परिक्षण लिहितो आहे
"२ रे "
हुश: ! झालं एकदाच टायटल तयार
"अगं बाई! अरेच्या २ "
एकदमच कसही करुन जुळवून आल्यासारखं झालयं ना, सिनेमाचंही अगदी तसंच झालय, विशेषत : केधार शिंदे आणि पहिला सिनेमा यांची पार्श्वभूमी असताना.
साधारण पणे कुठल्याही सिनेमाचा भाग -२ म्हणजे भाग -१ चा काहीतरी उल्लेख, रेफरन्स असतोच, अपवाद हा सिनेमा. त्यामुळे या सिनेमाचा भाग -२ असे नाव न ठेवता काही वेगळे नाव दिले असते तर ते जास्त संयुक्तीक ठरले असते. भरपूर विनोद, गावाकडली माती, मन उधाण वा-याचे हे बाहेर ठेऊनच सिनेमा पाहणे
लहानपणी आपण ऎकलेली गोष्ट एक राजा असतो आणी तो ज्या गोष्टीला हात लावेल ते सोने होतं असत, या सिनेमाची ही अशाच प्रकारची कथा

प्रेम. - स्पर्श - अपघात
मुख्य नायिका शुभांगी (सोनाली कुलकर्णी)
लहानपणापासून (हो अगदी शि - शू वर्गात असल्यापासून) अगदी लग्नाच्या दाखवण्याच्या कार्यक्रमांपर्यंत, ज्यांच्या प्रेमात पडते आणी त्यांना स्पर्श करताच ते( प्रेमवीर) २४ तासाच्या आत डोक्यावर पडतात ( त्यांना अपघात होतो) .
मग ती लग्न न करायचे ठरवते
(आता परत इथे मंगळ, शनी, गुरु, अष्टम स्थान, शांती करुन ही लग्न जमत नाही असे दाखवून जोतिष शास्त्राला बदनाम केले आहे, अरे त्या शुभांगिनेच ठरवले होते की लग्न करायचे नाही म्हणून, मग कशाला रे आमच्या मागे लागायचे, असो)
मग तिच्या आयुष्यात एक लेखक येतो ( चला लेखकाला तरी बरे दिवस येवोत ...)
आणी मग उत्तरार्धात परत
"प्रेम - स्पर्श - अपघात- आनंद"
आजकालच्या सिनिमात आवश्यक असणा-या सर्व गोष्टी आहेत जसे उकळणारा चहा (हो तो आवश्यक्ता झालाय) , प्रेम गीत, पाहुणे कलाकार आणि हो आजकाल मराठी सिनेमात भेटणारी माऊली, माऊली , माऊली म्हणजे पंढरीचा राजा
असो, अगं बाई अरेच्चा १ या सिनेमाने प्रेरीत होऊन हा सिनेमा पहायला जाणार असाल तर तुमची मर्जी........
बाकी सोनालीताईंविषयी आम्ही पामराने काय बोलावे, छानदिसल्यात त्याहीपेक्षा छान अभिनय केलाय, फक्त सिनेमातील एका प्रसंगात शॅंपेन पिऊन ताईंनी केलेला अभिनय फारसा रुचला नाही.
यातील मला एक गाणे खूप आवडले (माझ्या अनुदिनीत ऎकू शकालwww.kelkaramol.blogspot.in)
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो माझा
देव कुणी पाहिला
सावळी, विठाई, कान्हाई, कृष्णाई
काही दिवसानी केधार शिंदे साहेबांनी हे गाणे म्हणले नाही म्हणजे मिळवले
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो माझा
सिनेमा कुणी पाहिला....
शुभेच्छा

डोक्यावर न पडण्यासाठी
आणि सिनेमाही न पडण्यासाठी

Wednesday, March 18, 2015

शायरी


राम राम पाव्हनं !
राम राम , राम राम 

लेखणी, " शब्द "  घेऊन ये पाव्हण्यासनी 

नगं ..........

अवं , जोतिषाने  भविष्य सांगायला अन कवी ने कवितेला नग म्हणू नये । 

व्हय पण आम्ही  फक्त चारोळीच घेतो 

अन आम्ही काय 'शायरी ' वगैरे  घेतो होय , आम्ही  बी आमच्या आबा आज्जा पासनं   चारोळीच घेतो  …। 
असं म्हणता व्हय,  मग होऊन जाऊ द्या 
-----------------------------------------------
चार ओळी म्हणाल्या येता येता 
तू ही कर एका छान शायरी 

( शब्द म्हणाले मुळीच नको …. )

वेडा होऊन  जाण्या पेक्षा 
बरी आहे त्याची आहे ती पायरी …… 

तरीही म्हणाल्या चार ओळी 
भाषांतर कर शायरींचे 
गगनाला भिडणार आहेत  भाव 
यावेळी हापूस - पायरीचे 

( नि:शब्द )  अमोल 

Thursday, March 12, 2015

गुढीपाडवा २१ ला आहे, २२ ला नाही


अरे या गुगल बाबाला  सांगा रे कुणी तरी , गुढीपाडवा  २१ ला आहे, २२ ला नाही 

Tuesday, February 10, 2015

स्वच्छ दिल्ली


कालच्या  लाटेपेक्षा 
मोठी आली त्सुनामी 
विरोधकांना बोलायला 
मिळाली संधी नामी 

' झाडू 'न केले अभियान 
स्वच्छ  केली  दिल्ली 
संधी मिळाली सर्वांना 
आयती उडवण्या खिल्ली 


आपला  आम आदमी 
अमोल केळकर 

१०/०२/२०१५

Monday, February 9, 2015

आम आदमी पार्टी


सुकलेल्या कमळांना 
झाडूने केले साफ 


दिल्लीमध्ये जिंकून 
आले आहे आप 

अमोल केळकर 
१०/२/१५

Related Posts Plugin for WordPress, Blogger...