मुंबापुरी नगरात वर्दी दिली भारी
आदर्शचा राजा गेला नांदेडच्या वारी
मुंबईतल्या पालिकेवर मारु बघ खेळी
तिजोरीच्या चावीसाठी झुलतोमी उरी
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....
मंत्रालयात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके युत्या - आघाड्या करून
तास तास जातो पास टेंडर करुन
एक एक मंत्री जातो फाईली ठेऊन
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे !
यमुनेचे पाणी सर्व चहुकडे दाटे !
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....
( गद्य)
गल्ली बोळात लुकलुकणारा माझाच तो ' हात '
आणि पहिल्यांदाच जेंव्हा केला ' इंजीनाने' घात
' बाई' म्हणाली होती जा मुंबईला बदली बाबा
रांगत रांगत जेंव्हा घेतला होता ' घड्याळाने' ताबा
टिक-टिक करत घडाळ्याने टाकल पाऊल पुढलं
गजरच एकत राहिलो फक्त, उठायचंच राहिलं
( पद्य )
आज गेलो आहे आता पुरा अडकून
दचकून जगा होतो ' धनुष्य' पाहून
असा कसा कृपा 'शंकर 'उमेदवार देतो
नातेवाइक म्हणतो आणि तिकिट मागतो
मंत्रिपद गेले आता माझ्या 'हातातून'
उरे काय मला आता मुंबईमधून
जरी होते ओठी मा़झ्या ' बाणासाठी ' हसे
नजरेत मला आता भगवाच दिसे
तुझ्या मुंबईतून 'सेना ' हरवेल का गं
कधीतरी ' हात ' तुला आठवेल का गं
'नवी दिल्ली' जाण्यासाठी उभा रांगे मध्ये
माझ्यासाठी येईल का ' सत्ता ' मुंबईमध्ये
( मुंबईकर एका सुरात )
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....
अमोल केळकर
२०/०२/१२
No comments:
Post a Comment