नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, May 24, 2014

नमो नम: !


सकाळी साहेबांच्या केबीन मधे मह्त्वाची मिटींग चालू होती, सवईने मोबाईल साइलेन्ट मोड वर होता,बाहेर आल्यावर पाहिले तर ४ मिस कॊल !

आलेल्या फोनच्या नंबरावरुन हे सगळे फोन अहमदाबाद मधून आले होते. आता अहमदाबादहून मला कोणी, कशासाठी फोन केला असेल , असा विचार करत असतानाच  परत एकदा त्याच नंबरवरुन फोन आला ,
अरे अमोल, ’ किती , फोन करायचा रे !
अरे जोशी काकू , तुम्ही ? कशा आहात , आणि तिकडे गुजराथ मधे काय करताय? अहो , काकू जरा मिटिंग मधे होतो त्यामुळे फोन घेता नाही आला. मी एका दमात बोललो.

बरं, बरं ते जाऊ दे , अरे तुला सांगायचे म्हणजे , आरतीला १६ मेला मुलगा झाला. आणि त्यासाठीच मी इकडे आली आहे

हो का ? अरे वा , अभिनंदन , आरती कशी आहे
दोघेही छान. सिझरिंग झाले रे ! , मी न विचारताच त्यांनी मला सांगीतले

दुपारी १२. ४० , वेळ लिहून घे हा नीट, इती जोशी काकू
ओके काकू, पत्रिका काढायची आहे का ?

हो , रे ती काढायचीच आहे पण आधी जरा सांगशील का रे राशीवरुन ’ न ’ नाव येते का?

अहो काकू, ’ नरेंद्र ’ नाव जूने झाले आता, मी उत्स्फुर्त पणे बोलून गेलो.
.... काकूंनी बोलणे मधेच तोडले, म्हणाल्या अमोल मला माहित आहे तू आत्ता ऒफीस मधे आहेस, पण आज घरी गेल्यावर नक्की सांग, का मी फोन करू?
त्यांनी माझे बोलणे गमतीने घेतले नव्हते हे त्यांच्या आवाजावरून लक्षात आले, मी ही जरा नमते घेत म्हणले,नको नको, काकू मी उशीरा का होईना तुम्हाला फोन करतो..
चला फोन ठेवतो , थांब थांब , अरे तुला वेळ सांगितली ना ?
हो सांगितली की
आणि हो तुला माहिती आहे ना , आरतीची डिलेव्हरी अहमदाबादला झाली आहे, सासरी
हो काकू, म्हणजे जन्मगाव - अहमदाबाद बाळाचे बरोबर ?
बहुतेक त्यांना परत परत डिटेल्स बरोबर आहेत ना याची खात्री करुन घ्यायची होती, काही चूक नको,
चला ठेवतो फोन
एकच काम आधी कर, पत्रिका काढल्यावर बाळाला अमेरीकेला जायचा योग आहे का बघ बाबा
जावई एक - दोन वर्षात जायचे म्हणत आहेत
ह्म्म काकूंची अर्जेन्सी आत्ता कळली होती, बाळाला भारतात जन्म घेऊन २४ तास ही लोटले नव्हते, काकूंना आपला नातू ’ अमेरिकेला ’ जाणार का याची चिंता होती
संध्याकाळी घरी आलो पत्रिका काढली
वृश्चीक रास , जेष्ठा नक्षत्र , चरण २
राशी अक्षर - न , य
म्हणलं चला काकूंची एक इच्छा तरी पुर्ण होणार
परदेश योग आहे का हे पाहू लागलो , आणि कुण्डली परदेश जाण्यास अनुकूल स्थाने देत आहेत हे दिसून आले
काकूंना फोन लावला
अरे, अमोल केलास का अभ्यास? त्या जणू आतूर झाल्या होत्या ऐकायला
काकू सिध्दीविनायक तुमच्या दोन्ही इच्छा पुर्ण करणार
आता काय तुम्ही नातवाला अमेरिकेला पाठवणार. मग माझी फी डॊलर मधे देणार का रुपयात?
काकू हसायला लागल्या, अरे मुंबईत आले की भेटेनच की तुला
मी म्हणलं ठिक आहे काकू , अहमदाबादला जाऊन आलात की सिध्दीविनायकाला लगेच जाऊन या
आणि येताना भरुच्चे शेंगदाणे आणायला विसरु नका हा !
पण काकू , नातवाला अमेरिकेला पाठवत आहात, "अच्छे दीन इधर भी आने वाले है !"
या पुढ्चे वाक्य काकूंनी ऐकले की नाही माहित नाही
नमो नम: !
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...