फेसबुकने आज 'अधिक मासाची' आरती आमच्या भिंतीवर मेमरी म्हणून दाखवली मग आमच्या बुध्दीच्या कुवती नुसार आम्ही
' अधिक माजाची ' आरती मनसोक्त तयार केली 😝
( * मनोरंजन हा हेतू. ज्यांच्या भावना दुखावतील त्यांनी आधी अधिकमासाची आरती तोंडपाठ म्हणून दाखवावी)
अधिकमाज आरती !
ओवाळू आरती ! आता अँडमीन प्रभूला !
नियम व्रते लावितो ! पावतो स्व भक्ताला !! धृ !!
भरवशाच्या प्रतिक्रियेचा ! मळ संग्रही केला !
पाॅली- टिकली ! कुंकू हळद ! कपाळी बसविला !!
अमंगलकार्ये ! वर्ज्य त्यामधी ! पुण्यकर्म करती !
समुहाला ! विष्णूकृपेने ! अच्छेदिन आणिती !!
अंधाराचा नाश कराया ! मेंबर काढिला !
नियम व्रते लावितो ! पावतो स्व भक्ताला !! १ !!
हास्य सुंदरिला ! ठमिला फक्त चंद्रकलाराणीला !
अधिकनियमव्रत ! पुण्याईने ! प्रसन्न पशू झाला !
स्नान, दान , जप ! मौन भोजने कुबुद्धी सारावी !
दुर्व्यसनांचा ! त्याग करावा ! चैन सर्व सोडावी !
निर्मळ गुरुजी पुण्यप्रद हा ! मार्ग दावी सकला !
नियम व्रते पाळितो! पावतो स्व भक्ताला !! २ !!
१८/०६/२१ 📝
( बुध्दीची कुवत नसलेला)
No comments:
Post a Comment