दादर पूर्व आणि दादर पश्चिम जोडणारा परळ/ प्रभादेवी बाजूचा पादचारी पूल, तसेच त्या पूलापासुन कबुतरखाना आणि पूर्वेला पनवेलचा बस स्टाँप एवढा विस्तृत आमचा माॅल होता. इथल्या खरेदीची मजा त्रिखंडात नाही. अँमेझाँन वगैरे हे आत्ताचे लाड. खरेदीसाठी दादरला जाणे किंवा कामासाठी दादर ला गेल्यावर या 'ओपन टू स्काय ' माॅल मधील खरेदी न होणे म्हणजे फाँल समजायचा
तर साधारण १५-२० वर्षापूर्वी जेंव्हा एवढा ' मोबाईल स्मार्ट नव्हता ' किंवा फक्त संपर्कासाठी ज्याचा उपयोग व्हायचा त्याकाळात या आमच्या ओपन माॅल मधे एक मिरची सारखे उपकरण आले होते. आणि अल्पावधीत ते भयंकर लोकप्रिय झाले होते.
त्या मिरची सारख्या उपकरणात दोन तिन बटणे, अँटेना ,कानात घालायला हेडफोन आणि दोन पेन सेल
एकेकाळी मुंबई मार्केट मधे अधिराज्य केलेला हाच तो ' मिर्ची रेडीओ'
सुरवातीला १५० ते २०० रु पर्यत मिळणारा हा रेडिओ नंतर नंतर सर्रास १०० रु मिळाला लागला आणि खास घासाघीस करुन अगदी ८० पर्यत
असा हा रेडिओ खिशाला पेनासारखा अडकवून रस्त्यावर फिरणे ही एक क्रेझ होती
मात्र ही मिरची घालून बस किंवा रेल्वेत बसलं की तिने मान टाकलीच समजायचं
चायनात पिकलेली ही मिरची वाशी खाडी पूल ओलांडे पर्यत जरी टिकली तरी पैसे वसूल असे वाटायचे
आज १३ फेब्रुवारी , विश्व रेडिओ दिवसा निमित्य या 'तिखट ठरलेल्या मिर्च्ची रेडिओची ' एक आठवण
(📻) अमोल 📝
माघ.शु द्वादशी
१३/२/२२
No comments:
Post a Comment