नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, July 11, 2022

जन पळभर


 सध्याच्या राजकारणाला समर्पीत 📝

( भा.रा. तांबेंची क्षमा मागून)


जन पळभर म्हणतील हाय हाय

मी जाता राहील 'पक्ष ' काय?


झाडे दिसतिल, डोंगुर झळकतिल

सारे हाटीलात क्रम आचरतिल

असेच बंड पुढे तेवतिल

होईल कांहि का अंतराय?


( जन पळभर म्हणतील हाय हाय )


रिपोर्ट बनतिल, चर्चा झडतिल

त्वेषाने हे सामने रंगतिल

कुणा काळजी की न धरतिल

पुन्हा स्वकियांचेच पाय? 


( जन पळभर म्हणतील हाय हाय )


सख्खे सोबती हेवा करतिल

जिल्हा-शाखेत, नावे लागतिल

उठ-तिल, बस-तिल, तिकीट मिळवतिल

मी जातां त्यांचे काय जाय ?


( जन पळभर म्हणतील हाय हाय )


अशा (राज)कारणास काय कुढावें

मीही कुणाच्यात कां गुंतावे?

'इडी'दूता कां विन्मूख करावे? 

का पाहु नये 'खोक्यात' काय?


( जन पळभर म्हणतील हाय हाय )


१२/०७/२२

अमोल

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...