नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, November 19, 2022

मुंबईची थंडी


 मुंबई अनेकांची फॅन आहे. अनेकांचे फँन्स मुंबईत आहेत. पण मुंबईतील घराघरातील 'फॅन्स' मात्र बंद करण्याचा  'थंड -ग्रह'ण योग सुरु झालाय. याचा मोक्ष आठवड्याभरात  होईलच


 राजापूरला गंगा अवतरणे याचे जसे महत्व आहे, त्या एवढेच महत्व   अख्खी मुंबई जी ची फँन आहे ती 'थंडी मुंबईत पडणे'   याला आहे असे आमचे स्पष्ट मत .

 एरवी शेअर ' मार्केट पडले किंवा चालू सरकार आज / उद्या/ परवा 'पडेल' या पडेल चर्चा चालू असतातच. फारतर गेल्या काही दिवसापासून अंधेरीचा

 ' गोखले पूल' पाडणार किंवा अगदी आजचा ' कनाक ब्रीज' पाडण्यासाठी २७ तास 'जम्बो ब्लाँग' घेतलाय या पोटात गोळा येणाऱ्या बातम्या पाडण्यात सर्व वाहिन्या मग्न आहेत.


तर मंडळी अशा या गुलाबी  थंडीतला आजचा रविवार. तोच चहा पण त्याला वाफाळलेला चहा अशी उपमा देऊन,  सोबत घरचा गरमागरम उपमा खाऊन कुठेतरी ठेवलेला स्वेटर, मफलर, कानपट्टी हुडकून ठेवा उद्यासाठी.


रविवारच्या पेपरातील आठवड्याचे राशी भविष्य वाचणा-यांसाठी एक गोष्ट सांगतोय जी कुठल्याच पेपरात वाचायला मिळणार नाही ती म्हणजे


उद्या, १२ ही राशीच्या सेंट्रललाईन वरुन प्रवास करणाऱ्यांना आँफीस ला जाताना 'लेटमार्क-सेंट्रल' योग आहे.


२७ तासाचा चालू असलेला मेगाब्लाॅगचा, थंडीत पडणा-या प्रदूषणरुपी धुक्याशी अत्यंत तीव्र प्रतियोग आहे, तस्मात आपल्या नेहमीच्या वेळेची गाडी न पकडता त्या आधीच्या  गाड्या पकडाव्यात हे सांगणे.


तर मंडळी, ३६० दिवस आपल्या सोबत असणाऱ्या   नेहमीच्या मित्राला ( घामाला)  सुट्टीवर पाठवून ५-६ दिवसासाठी आलेल्या मैत्रिणी ( थंडी) बरोबर तुमचे पुढचे काही दिवस आनंदाचे जावोत या शुभेच्छा 🙏💐


शेवटी नेहमीप्रमाणे ४ ओळी


अक्षरांना घालून मफलर

शब्दांना घातली एकत्र बंडी

सरंजाम हा सगळा पाहून

हसायला लागली मुंबईची थंडी 🔥☃


#माझी_टवाळखोरी 

📝२०/११/२२

( अमोल)

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...