https://youtu.be/wyTeHls4-Ac
' झेंडा ' सिनेमातील एक गाणे थोडंसं बदलून *
मुळ गाणे: सावधान सावधान वणवा पेट घेत आहे
आमचे गाणे: सावधान सावधान 'नवले ब्रीज ' येत आहे 📝
( * प्रासंगिक वस्तुस्थिती )
सावधान सावधान सावधान सावधान
'नवले ब्रीज ' येत आहे
कात्रजच्या बोगद्यातून निट चालवून भागणार नाय
दृष्ट लागली उताराची ,स्पिड वाढवून चालणार नाय
निट चालका, चांदणी चौक तुला साद देत आहे
सावधान सावधान, सावधान सावधान
'नवले ब्रीज ' येत आहे
पुण्याच्या नशिबी जरी कात्रजचा बायपास आहे
खड्डयांना जाऊ चुकवूनी, वळणावरती 'लेक' आहे
नशिबाची फक्त साथ, जी बस भक्कम आहे
सावधान सावधान, सावधान सावधान
'नवले ब्रीज ' येत आहे
पुरे जाहले रस्त्यांवर 'ढोंगी' कौतुक सोहळे
ट्रॅफिक इथला मस्तवाल अन ब्रीज जाहले बावळे
असो पावलोपावली शत्रू पण तू जिवंत आहे
सावधान सावधान, सावधान सावधान
'नवले ब्रीज ' येत आहे
( सावध) अमोल
२५/११/२२
#माझी_टवाळखोरी
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment