नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, January 21, 2024

ड्रीम रन


 #हर_🧡_मुंबई 

#पळतीय_मुंबई 🏃🏻‍♂️



वर्षातले किमान ३०० दिवस तरी सामान्य मुंबईकर सकाळ - संध्याकाळ पळतच असतो. 

*On Your Mark*

 ( घरातून निघताना)

*Get Set* 

( जवळच्या स्थानकापर्यंतचा प्रवास)

*Go*

( फलाटावर येणारी नेहमीची लोकल पकडून कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे)


प्रत्येक जण या प्रोसेस मधूनच जातो. फक्त कुणाची Get,set, go ची  वेळ ६:१७ कुणाची ७:२८, तर कुणाची ८:०३ इतकाच काय तो फरक


परतीचा प्रवास ही असाच ठरलेला, वेगवेगळ्या वेळेत घडणारा


आणि हे सगळं कशासाठी ? 

" अनंत स्वप्नपुर्तीसाठी "

मुंबई पळते, धावते,  अडखळते, धडपडते पण अगदी अपवादानेच बंद राहते, ती ही अगदी क्षणभरच.


समाजा बद्दल कृतज्ञता म्हणून तसेच रोजच्या 'रन' मधून विरंगुळा आणि मुंबई बद्दलचा जिव्हाळा, तमाम मुंबई-नवी मुंबई- कल्याण- ठाणे, पनवेल- वसई-विरारपर्यतच्या ( महामुंबई) सर्वांना आज वर्षातून एकदा एकत्र आणतो ते या


"ड्रीम रन "साठी 🏃🏻‍♂️🏃🏼‍♀️

अर्थात मुंबई मॅरेथाॅनच्या निमित्याने 


एकदम साजेसे नाव. कोण म्हणतं नावात काय आहे?


५९,००० नोंदणी

 त्यातील किमान ५०-५५ हजारजण तरी नक्कीच पळतायत. 

रोज वेगवेगळ्या लोकलमधून येणारे आँफीस सहकारी आज एकत्र गप्पा- गोष्टी, हास्य- विनोद,अन् नेहमीच्या ठिकाणी गाॅसिपींग न करता मरीन ड्राईव्हर समु्द्राला साक्षी ठेऊन गाॅसिपींग करत चाललेत ( sorry पळतायत 😬)

हक्काची सुट्टी असून ही आज १ दिवस सर्वजण जमलेत ते मुंबईवरील प्रेमाखातर. हे ही एक #मुंबई _स्पिरीट


आणि हो मुंबईकरांसाठी डिजिटचे महत्व किती असते हे वेगळं सांगायला नको. लोकलच्या वेळापत्रका प्रमाणेच ही ड्रिम रन पण ५.९ किमी बरं का!  ( ६ किमी नाही) 


मरीन ड्राईव्ह तर नुसती जत्रा. एरवी याच रोडवर चारचाकी गाड्यांच्या पुढे जाण्यासाठी जी कसरत करावी लागायची तीच आज एकमेकांना ओलांडून पुढे जाताना माणसांना करावी लागत होती.


या मॅरेथाॅनचे खास निमंत्रित मात्र अगदी अगदी थोडावेळ का होईना हजेरी लावून गेले.  तशीही त्यांना मुंबई फारशी आवडतच नाही म्हणा!


कोण काय विचारताय? थंडी/ गारवा ओ 😁


असो, यानिमित्याने तमाम मुंबईकरांना एक प्रेमळ सल्ला:-


*पळणे इथल्या जगण्याचे,तत्व मनी तू जाण!*

 *ही एकची गोष्ट मनी वसो, जोवरी देही प्राण!*


आणखी एक टिप: ज्यांना पुढल्या वेळेला पहिल्यांदाच ड्रीम रन मधे भाग घ्यायचा आहे त्यांनी यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत उभे राहून सराव करावा. Starting point येईपर्यंत रांगेतच खुप वेळ जातो.


🏃🏻‍♂️🏃🏼‍♀️🏃🏻‍♂️

          🏃🏼‍♀️🏃🏻‍♂️🏃🏼‍♀️  

                          🏃🏻‍♂️🏃🏼‍♀️


अमोल केळकर ( नवी मुंबई)

२१/०१/२०२४ 📝


#मुंबई_मॅरेथाॅन #Mumbai_Marathon 

#ड्रीम_रन #Dream_Run 

#टीम_मुकंद #Team_Mukand

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...