सध्याच्या एकंदर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीला समर्पित:-
( मुळ गाणे येईल लक्षात)
तिढा कळेना, तिढा मिटेना
तिढा खंत करी काही केल्या सुटेना !
गेले 'वर्षाच्या' बनी
चालली नेत्यांची वाणी
"जिंकू पायात पाय अडकवून रे"
गेले 'सागर' किनारी
गंध पोचला राजधानी
शत्रूसंग गळाला आली 'सिट' रे !
चल ये रे, ये रे गड्या
नाचु उडू घालू फुगड्या
खेळू 'इडी' 'झिम्मा झिम्' हीच आपली थीम्
आ sssss आ ass आ 🎼
तिढा कळेना, तिढा मिटेना
तिढा खंत करी काही केल्या सुटेना !
महा-राष्ट्राचे आंगण
आम्ही करु भांडण
जुने उकरु आपण सारे 'वाद'रे
'जन' दुर्लक्षित 'किडे'
यांची धाव व्हाटस्पकडे
आपण करु 'शुध्द' लूट-मार रे !
'तिढा' गाठी आला सुटून
नाव आले, यादीत छापून
कोण मी? - पक्ष? 'आया' की 'गया' राम रे ? ?
#राजकीय_टवाळखोरी 📝
अमोल केळकर,बेलापूर
०३/०४/२४
फाल्गुन.कृष्ण नवमी,
No comments:
Post a Comment