नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, May 1, 2024

स्वरगंधर्व सुधीर फडके


 

*देव देव्हा-यात नाही, देव नाही देवालयी*


सुधीर ना तू ?


अरे तुझ्या नावातच धीर धरणे आहे.


काळजी करु नकोस, 

आम्ही सगळे तुझ्यासोबत आहेत.

सर संघ चालकांचे हे प्रेरणादायी शब्द सुधीर फडके यांना अडचणीच्या वेळी उभारी देऊन गेले.


काही दिवसांपूर्वी  जागतिक पुस्तक दिनानिमित्य एका शाळेत माझ्या पुस्तकातील 'उत्प्रेरक' या प्रकरणावर बोलताना मी म्हणालो होतो की आयुष्यात अशा काही व्यक्ती / घटना- प्रसंग  / गोष्टी येतात की ते तुमच्यासाठी 'कॅटॅलिस्ट' बनतात.


आज 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा पाहिल्यावर माझ्यासाठी हा सिनेमा नक्कीच 'उत्प्रेरक ' ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा सिनेमा पहायचा राहिला हे शल्य हा सिनेमा पाहून थोडे का होईना कमी झाले.


स्वत: निर्माण केलेल्या वीर सावकर सिनेमाची ४ तिकीटे विकत घेऊन फडके सिनेमा बघायला येतात ही सिनेमाची सुरवात. दूरदर्शन वरील प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातील मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट फ्लॅशबॅक स्वरूपात उलगडू लागतो.


अत्यंत संघर्षमय तारुण्याचा काळ, आत्महत्या करावी इतका टोकाचा विचार पण सुदैवाने संघ स्वयंसेवक म्हणून मिळत जाणारी मदत आणि एका  टप्यावर आयुष्याला मिळालेली कलाटणी. थक्क करणारा बाबूजींचा हा प्रवास


मुंबई - नाशिक- मालेगाव - पंजाब-कोलकत्ता- कोल्हापूर - पुणे या त्यांच्या प्रवासाबरोबर प्रत्येक घटनेला अनुसरून त्यांचीच गाणी,यांची छान गुंफण झाली आहे


हा माझा मार्ग एकला - ते - फिटे अंधाराचे जाळे व्हाया गीत रामायण ऐकता ऐकता ३ तास कसे संपतात कळत नाही 


गदिमा - बाबूजींची जुगलबंदी छान रंगलीय


काही टवाळखोर निरीक्षणे

१) दूरदर्शन च्या आवारात बाहेर फिरताना काही क्षण सुनील बर्वें मधे अजीत पवार यांचा भास  झाला. तर सिनेमातील आशा भोसलेंच्या केसांचा रंग जरा पांढरा असता तर अगदी सुप्रिया ताई...😬

२) गीत रामायण रौप्य महोत्सवी कार्यक्रमात पुण्याला अटलजी त्यांच्या भाषणात म्हणतात 'सुधीर फडके और मेरा पुराना रिश्ता है'😳  ( इथे आमचाच घोळ झाला)

३) अंकित काणे हे आमचे फेसबुक मित्र. त्यांनी आधीच एक पोस्ट टाकून या सिनेमात त्यांनी पु.लं.ची भूमिका केली हे सांगितले होते म्हणून बरं. नाहीतर हे पु.लं आहेत हे कळलेच नसते 😷

४) किशोर कुमार हे विनोदी नट होते पण त्यांचं फारच विनोदी पात्र इथे सादर केले गेले आहे . 😄

बाबूजींनी संगीतबद्ध केलेले आणि त्यांनी म्हणलेले गाणे 

' दिन है सुहाना आज पहिली तारीख है ' 

तर योगायोगाने आज १ ल्या तारखेलाच 

गुरु ग्रह मेषेतून, वृषभ या रसिक राशीत गेला असताना आमच्यासाठी 


*ग्रह आले जुळुनी, अनुभवली सगळी सुरेल गाणी* 🎼


#माझी_टवाळखोरी 📝

#स्वरगंधर्व_सुधीर_फडके

०१/०५/२०२४

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...