नसतेस कधी तू जेंव्हा, जीव तुटका तुटका होतो
मुंबईचे तुटती धागे, प्रवास फाटका होतो
'महा ब्लाॅकची' न्यूज पडावी,कल्लोळ तसा ओढवतो
सेंट्रल दिशाहीन होते अन हार्बर पोरका होतो
येताच फलाटावरती, हिरमसून जातो मागे
स्टेशनावर थबकून सारा, मग चाकरमानी जातो
तव डब्यात शिरण्याच्या,मज स्मरती घातक वेळा
घामाविन शरीर असावे, मी अजून अगतिक होतो
तू सांग सखे मज, काय सांगू मी घरदारा
सिग्नलचा जीव उदास, माझ्यासह लाललाल होतो
न अजून झालो मोठा, न गाडीवाला झालो
तुजवाचून ट्रॅफिक वाढे, तुजवाचून प्रवास नासतो
( लोकल प्रेमी ) अमोल 📝
#माझी_टवाळखोरी
No comments:
Post a Comment