ताराबाई भवाळकर आणि माझी_टवाळखोरी 📝
मी ११- १२ वीत असताना ( १९९२-१९९३ ) आईच्या एका पुस्तकाचे प्रकाशन ( पुस्तकाचे नाव बहुतेक: कृष्णस्पर्श) नेमिनाथ नगरला झाले होते, ताराबाई भवाळकर अध्यक्ष होत्या. त्यावेळी पहिल्यांदाच त्यांना पाहिले होते.
या कार्यक्रमात शेवटी होणारे आभार प्रदर्शनाचे काम मी केले होते.
त्यानंतर..
२०१७ साली आईच्या 'मृगजळाकाठी' या कविता संग्रहाचे प्रकाशन सांगलीला ताराबाई भवाळकर यांच्या हस्ते मथुराबाई गरवारे महाविद्यालयात झाले.
या कार्यक्रमात ही आभार प्रदर्शन मी केले होते.
पहिल्या आणि दुस-या कार्यक्रमात फरक इतकाच होता की दुस-या कार्यक्रमावेळी माझी सांगली स्टेशनला हुबळी-दादर रेल्वे चुकू नये म्हणून 'आभार प्रदर्शन' सगळ्यात आधी केले गेले आणि मग मुख्य कार्यक्रम झाला होता
माझी_टवाळखोरी पुस्तक प्रत्यक्ष भवाळकर बाईंना त्यांच्या घरी जाऊन देण्याच्या काही वर्ष आधीच त्यांना टवाळखोरीची चुणूक मी दाखवली होती. 🤪
अर्थात यापुढे लिखाण होईल न होईल पण ताराबाई भवाळकरांचे आशीर्वाद मिळाले हे मी माझं भाग्यच समजतो
#माझी_टवाळखोरी 📝
संकष्टी चतुर्थी
२०/१०/२४
No comments:
Post a Comment