नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, November 11, 2025

भूखंड घेतला लांब


 विडंबनवर असलेली पूर्ण स्टॅम्प ड्यूटी वगैरे  भरुन आणि गदिमा,बाबूजींची माफी मागून 🙏🙏

( *मनोरंजन हा हेतू) 


नाही खर्चली कवडीदमडी, नाही भरला दाम

भूखंड घेतला लांब, दादा मी भूखंड घेतला लांब


कुणी म्हणे ही असेल चोरी

कुणा वाटते असे उधारी

जन्मभरीच्या श्वसाइतके ढापियले मैदान

भूखंड घेतला लांब


बाळ गुराखी मुठेवरचा

वचक असे सर्वांवरचा

हाच आत्याचा भाच्चा आणि युतीचा अभिराम

भूखंड घेतला लांब


जितके मालक तितकी नावे

पुण्यनगरी यांची गावे

सर्वही ओळखी देती 'देवा' 'क्लिन चीटचा' पैगाम

भूखंड घेतला लांब, दादा मी भूखंड घेतला लांब


#माझी_फुसकुंडी 📝 *

१२/११/२५

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...