क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...
Friday, March 16, 2012
Thursday, March 15, 2012
नवनिर्मीती
नवनिर्मीती
होत असताना
झेलावे लागतात
आघात !
तेंव्हाच पुढे जाउन होते
बछड्याचे रुपांतर
वाघात !!
मनसेच्या पहिल्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल श्री. वाघांचे अभिनंदन !
होत असताना
झेलावे लागतात
आघात !
तेंव्हाच पुढे जाउन होते
बछड्याचे रुपांतर
वाघात !!
मनसेच्या पहिल्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल श्री. वाघांचे अभिनंदन !
Wednesday, March 14, 2012
स्त्रीह्ट्ट
जनतेच्या प्रेमापोटी !
दुर्गामाता अवतरली !
त्रिवेदींची रेल्वेगाडी
रुळावरून घसरली !!
माजघर ते राजगृह !
एकच अंतीम सत्य आहे !
बालहट्ट ही ममता तर !
स्त्रीह्ट्ट हा वणवा आहे !!
अमोल केळकर
१५/०३/२०१२
दुर्गामाता अवतरली !
त्रिवेदींची रेल्वेगाडी
रुळावरून घसरली !!
माजघर ते राजगृह !
एकच अंतीम सत्य आहे !
बालहट्ट ही ममता तर !
स्त्रीह्ट्ट हा वणवा आहे !!
अमोल केळकर
१५/०३/२०१२
झोपेतली गोडी
कोणा कशी कळावी झोपेत काय गोडी
जांभई सुरु होता गाठावी वरची माडी
कासवछाप लावावे
जरी तोच डास चावे
घेऊनी निजलो फरशीवर गोधडी
करिता अजाण चाळे
हसती चतुर बाळे
माझ्याच घोरण्याची करतील गं चहाडी
झोपले कुणी झोपू दे
उठले कुणी उठू दे
राही तशीच आता गादी-उशीची जोडी
Friday, March 9, 2012
Tuesday, March 6, 2012
मराठी पाऊल पडते पुढे -
मनोवृती खेकड्याची !
नाही कुणी म्हणणार !
ठाण्याबरोबर नाशकातही !
मराठी पाऊल उमटणार !
जय महाराष्ट्र !
Monday, March 5, 2012
Friday, March 2, 2012
खेळ संपला.......
चार दिवसाचा पाहूणचार
थोडक्यात आटोपला !
असा कसा अविचार
तुमच्या कडून घडला !
सा-या भारताचे लक्ष आजच्या खेळाकडे होते !
तुमच्या विजयावरच
खेळाडूंचे शॊपींग ठरणार होते !!
थोडक्यात आटोपला !
असा कसा अविचार
तुमच्या कडून घडला !
सा-या भारताचे लक्ष आजच्या खेळाकडे होते !
तुमच्या विजयावरच
खेळाडूंचे शॊपींग ठरणार होते !!
Wednesday, February 22, 2012
Sunday, February 19, 2012
दमलेल्या ( पृथ्वी ) बाबाची कहाणी
मुंबापुरी नगरात वर्दी दिली भारी
आदर्शचा राजा गेला नांदेडच्या वारी
मुंबईतल्या पालिकेवर मारु बघ खेळी
तिजोरीच्या चावीसाठी झुलतोमी उरी
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....
मंत्रालयात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके युत्या - आघाड्या करून
तास तास जातो पास टेंडर करुन
एक एक मंत्री जातो फाईली ठेऊन
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे !
यमुनेचे पाणी सर्व चहुकडे दाटे !
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....
( गद्य)
गल्ली बोळात लुकलुकणारा माझाच तो ' हात '
आणि पहिल्यांदाच जेंव्हा केला ' इंजीनाने' घात
' बाई' म्हणाली होती जा मुंबईला बदली बाबा
रांगत रांगत जेंव्हा घेतला होता ' घड्याळाने' ताबा
टिक-टिक करत घडाळ्याने टाकल पाऊल पुढलं
गजरच एकत राहिलो फक्त, उठायचंच राहिलं
( पद्य )
आज गेलो आहे आता पुरा अडकून
दचकून जगा होतो ' धनुष्य' पाहून
असा कसा कृपा 'शंकर 'उमेदवार देतो
नातेवाइक म्हणतो आणि तिकिट मागतो
मंत्रिपद गेले आता माझ्या 'हातातून'
उरे काय मला आता मुंबईमधून
जरी होते ओठी मा़झ्या ' बाणासाठी ' हसे
नजरेत मला आता भगवाच दिसे
तुझ्या मुंबईतून 'सेना ' हरवेल का गं
कधीतरी ' हात ' तुला आठवेल का गं
'नवी दिल्ली' जाण्यासाठी उभा रांगे मध्ये
माझ्यासाठी येईल का ' सत्ता ' मुंबईमध्ये
( मुंबईकर एका सुरात )
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....
अमोल केळकर
२०/०२/१२
Monday, February 13, 2012
Tuesday, January 31, 2012
Friday, January 27, 2012
प्रगती
प्रगती झाली संघाची !
पाचव्या दिवशी खेळणार आहे !
बाराच्या भावात जाता जाता !
लाज थोडिशी वाचणार आहे !!
पाचव्या दिवशी खेळणार आहे !
बाराच्या भावात जाता जाता !
लाज थोडिशी वाचणार आहे !!
Friday, January 20, 2012
Thursday, January 19, 2012
Wednesday, January 18, 2012
Monday, January 16, 2012
Saturday, January 14, 2012
तात्काळ सेवा
' तात्काळ सेवेचा' लाभ आता !
मंदिरातही घेता येतो !
शंभराच्या पावतीत !
हवा तसा प्रवेश मिळतो !!
मंदिरातही घेता येतो !
शंभराच्या पावतीत !
हवा तसा प्रवेश मिळतो !!
Monday, January 9, 2012
हती आणि माया
जनतेला हताशी धरून
माया साठवायची
अन
निवडणुक लागली की
तिलाच झाकायची
सध्या तरी आता
पुतळा झाकायला हवा
हत्ती एवढ्या मायेला
संहीतेचा आधार हवा
माया साठवायची
अन
निवडणुक लागली की
तिलाच झाकायची
सध्या तरी आता
पुतळा झाकायला हवा
हत्ती एवढ्या मायेला
संहीतेचा आधार हवा
Subscribe to:
Posts (Atom)









