नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, December 30, 2014

व्हा पुढं … २०१५ साठी


२०१४ च्या उत्तरार्धात  एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कुठल्याही फालतू  चारोळी कवितेला  वारेमाप  प्रसिध्दी  मिळवून  द्यायची असेल  असेल तर त्या कवितेच्या/ चारोळीच्या खाली   फक्त लिहायचे 
 कवी: " तुम्हाला माहीतच आहे ", " सांगायला हवे का? " , "आपले नेहमीचेच" इ. इ. 
बस ! ती कविता/ चारोळी अशी प्रसिध्द पावते की विचारायची सोय नाही 
कुणी तरी म्हणले आहे ना , नावात काय आहे ?
 (  हे कोण म्हणले , आठवले का…. ? असे कृपया विचारू नये )

तर असो  मला काय म्हणायचे आहे  की ….  मला काय म्हणायचे आहे  की ….

कवीचे नाव नसेल तर कविता,   करू नका सादर 
कवीचे नाव नसेलतर कविता,   करू नका सादर 
पुढील इलेक्शनसाठी माझा 
मतदार संघ असेल ' दादर '
********************************************
कवी: आठवले का ?  आठवले, आठवले ,  नक्कीच आठवले…. 

काही क्षणात ही कविता ग्रुपच्या ग्रुप वर फिरायला लागेल. बिन नावाने का होईना झालात ना प्रसिध्द , नावात काय आहे ? 

आणखी एक गोष्ट आमच्या लक्षात आली आहे , ते म्हणजे 
फेसबुकवर विचारत नाही कुत्र
फेसबुकवर विचारत नाही कुत्र
आणि आजकाल Whatsapp नेच 
हाती घेतली आहेत सुत्रं …. 

कवी: परत तेच नेहमीचे यशस्वी …. 
***********************************************

तळ टिप :
३१ डिसेंबर साठी सर्व कार्यकर्त्यांना विशेष सुचना:

आजच्या दिवशी चंद्राचे !
नक्षत्र आहे भरणी !
दारू पिऊन घशाची! 
करू नका बरणी !
कवी: सांगायला हवे का?

अशारितीने मी सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की   हा फेसबुकवरचा माझा शेवटचा धागा … 
तुमचा राम राम घेतो ! २०१५ साठी व्हा पुढं - 


विशेष सूचना  : फक्त आलिया साठी ( इतरांनी वाचण्यास हरकत नाही )

शेवटचा धागा म्हणून मला फोन बिन करू नकोस. शेवटचा म्हणजे शे - व्होटचा ( १०० लाईकाचा ) असा त्याचा सुप्त अर्थ आहे. पुढील वर्षी मराठीची शिकवणी लावायची असेल तर अवश्य संपर्क कर. 

तुझा मित्र बंधू 
क. वी . आठवले 

Wednesday, December 24, 2014

३१ डिसेंबर - पार्टी


३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी 
तुकोबा लागलेत  आठवायला 
काय धाड भरली होती का 
वर्षभर पैसे साठवायला … 

पुढल्या वर्षीच्या तयारीला 
आत्ता पासून लागा 
अन ग्रुप एडमीन  सांगेल  
अगदी तसेच वागा 

व्हा पुढं  !!!!

( तुमचा ) ग्रुप एडमीन 
२४/१२/२०१४

Friday, December 19, 2014

नवीन वर्षाचे संकल्प


नवीन वर्षाचे संकल्प

Thursday, November 27, 2014

शाकाहारी ओनर्स असोसिएशन


स्वप्नातले घर बघताना  
नको कुणाच्या आहारी … 
फक्त एकच लक्षात ठेवा 
तुम्ही पाहिजे  शाकाहारी…. 

मांसाहारी असाल तर 
बिल्डर दाखवतो लाल झंडी….
असाने कशी बनणार 
घरी आमच्या चिकन हंडी … 

अमोल केळकर 
२८/११/१४

Wednesday, November 26, 2014

हातच्या रेषा


एकवार भिंगामधूनी बघ माझा हात,
शेवटची आशा माझी तुझ्या भविष्यात 

Sunday, November 16, 2014

९० मिनीटाचा उपवास …


ए , " एलिझाबेथ म्हणजे काय रे ?"
ते एका राणीचे नाव आहे !
हो, पण अर्थ काय ?
एलिझाबेथ म्हणजे, टिकाऊ !
टिकाऊ ?
हो , ती खूप वर्ष टिकली ना !!
" दगड ! दगड ! दगड ! दगड ! "





एलिझाबेथ एकादशी या सिनेमातील हा संवाद. अशा अनेक संवादाने, लहान मुलांसहित सर्वांच्या उत्तम अभिनयाने नटलेला, सरळ,सोपा कौटुंबिक सिनेमा " एलिझाबेथ एकादशी" !
एकादशी म्हणले की आठवतात ते वर्षातल्या दोन महत्वाच्या एकादशा . अर्थात पंढरपुरचा विठूराया आणि एकादशीचे अतूट नाते. वर्षातील दोन महत्वाच्या एकादशीपैकी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचे कथानक गुंफले आहे







सिनिमाच्या सुरवातीची काही मिनिटे " श्रीहरीच्या " सकाळच्या पूजेच्या दृश्याने होते . यावेळेचे पंढरीच्या राजाचे जे दर्शन चित्रीत केले आहे ते केवळ अप्रतीम. अभ्यंग स्नान ते आरती फारतर २-४ मिनिटे पण त्या विठूरायाचे जे दर्शन मिळते ते खरोखरच सुरेख. संपुर्ण सिनेमाचे चित्रीकरण, विषय पंढरपूरशी संबंधीत असूनही हा देवळातील विठोबा सिनेमात दिसतो तो फक्त सुरवातीला. त्यानंतर अगदी शेवटी नेहमीप्रमाणे सिनेमाचा शेवट गोड होतो(चमत्कार होऊन)तो होण्यासाठी दिग्दर्शक परत या विठोबाकडे येत नाही ही मोठी जमेची बाजू . नाहीतर विठूरायाला साकडे घालून, मोठे मोठे संवाद म्हणून चित्रपटाची लांबी १० - १५ मिनिटाने तरी लांबवता येणे सहज शक्य होते . असो
एका गरीब कुटुंबातील आई, आजी, छोटा मुलगा ( ज्ञाना ) त्याची बहिण ( झेंडू उर्फ मुक्ता ) यांचे हे कथानक . घरातल्या घरात मशीनवर कपडे विणून चरितार्थ चालवणारी आई , तिचे हे मशीन कर्जाची परतफेड न केल्याने जप्त होते. पैसे भरण्याची अंतीम तारिख दिल्यानंतर , आणि किती पैसे भरल्यावर हे मशीन परत मिळेल हे सांगितल्यावर संपुर्ण कुटूंब कसा प्रयत्न करते याचे हे कथानक ..









ज्ञाना, झेंडू , गण्या आणी इतर मित्र यांचा सहजसुंदर अभिनय, प्रासंगिक विनोद , उत्तम संवादलेखन हा या सिनेमाचा आत्मा
हा सिनेमा मला एका दृष्टीने वेगळा वाटला ते म्हणजे श्रध्दा आणि शास्त्र यांचा घातलेला योग्य मेळ. पांडूरंगा बरोबरच संत न्यूटन यांचे विचार ही इथे दिले गेले आहेत. सिनेमात अवास्तावी धार्मिकता , अंधश्रध्दा दाखवणे सहज शक्य होते पण ते टाळण्यात यश आले आहे आणि ही मोठी जमेची बाजू . प्रामाणिक प्रयत्न,विश्वास आणि कृती तुम्हाला अपेक्षित यश देते हे इथे मुलाना समजून देण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे









" एलिझाबेथ एकादशी " च्या संपूर्ण टीम चे त्यासाठी अभिनंदन
मराठी सिनेमाला संजीवनी देण्यासाठी हा सिनेमा पहिला ' श्वास ' ठरो या शुभेच्छा 
आजकाल सिनेमा संपल्यानंतर एक ( प्रसिध्द ) गाणे दाखवणे ही हिंदी सिनेमाची पध्दत याही सिनेमात आहे . तेंव्हा पिक्चर संपला रे संपला की लगेच जाऊ नका. ज्ञाना , गण्या आणि झेंडु ने या गाण्यातही धमाल केली आहे ती बघूनच जावा ।







हा ९० मिनीटाचा एकादशीचा उपवास तुम्हाला नक्कीच २१ एकादशीचे पुण्य देईल ही आशा
आता परीक्षण म्हणले की १० पैकी या सिनेमाला किती गुण द्याल ? असा प्रश्ण आला
मी तरी १० पैकी ८ गुण देईन
२ मार्क का काटले? माहित नाही पण मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत ना भौ …।
परीक्षक ) अमोल केळकर
सी ५, ३३, ०:२, सेक्टर ५
सीबीडी बेलापूर , नवी मुंबई
९८१९८३०७७०
a.kelkar9@gmail.com

Tuesday, November 11, 2014

स्वच्छता अभियान


स्वच्छता  अभियानाला , आले नेते 
फटाक्याने करू स्वागत ...

तोच कचरा साफ करायला 
मग वेळ नाही लागत ...
अमोल केळकर
12/11/14 

Monday, November 10, 2014

शिक्षण


कुणी शिका मराठी , कुणी शिका उर्दू 

मात्र जो घेईल शिक्षण 
त्यालाच आम्ही वंदू 

अमोल केळकर 
११/११/१४

Sunday, November 9, 2014

तळ्यात - मळ्यात


खूप झालं आता 
तळ्यात - मळ्यात 
घाला लवकर हात 
एकमेकांच्या गळ्यात 

स्वाभिमाना बरोबरच 
सत्ताही आहे महत्वाची 
अशी नामी संधी 
परत नाही यायची 

अमोल केळकर
 १०/११/१४

Saturday, November 8, 2014

विरोधक



वाटलं तर सरळ सांगतो 
विरोधात बसा जाऊन 
बहुमत कसे मिळेल ते 
आम्ही घेऊ ना  पाहून 


अमोल केळकर 
८/११/१४

Wednesday, November 5, 2014

ओळखलत का साहेब मला?’


ओळखलत का साहेब  मला?’ परत  आला कोणी,
कपडे होते फाटलेले पण , मधाळ त्याची वाणी 


क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे  राहुन’.

कार्यकर्त्यांसह आम्हाला,  चार आश्वासने भेटली,
स्वबळावर सत्ता येता,  आमची वाट लावली .

पक्ष सोडला ,चूक झाली  , होते नव्हते ते गेले,
निवडणूक होईपर्यंत त्यांनी फक्त, राबवून घेतले 

कार्यकर्त्यांना  घेउन संगे ,  साहेब  आता लढतो आहे
राहिलेली कामे पुर्ण करून , मतदारसंघ घडवत आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पद  नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला.

आलेल्या   लाटेत खुर्ची गेली  तरी मोडला नाही कणा,
पक्षात परत घेउन तुम्ही,  फक्‍त लढ म्हणा

(लढाऊ ) अमोल केळकर 
६/११/१४

Happy New Year


त्याचा तो सिनेमा ना 
खूपच आहे सुमार !

कारण त्यात नाही 
माझा लाडला कुमार !!

अमोल केळकर 
६/११/१४

Tuesday, November 4, 2014

दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले



नारायण सुर्वे यांची क्षमा मागून

दोन दिवस मुंबईत  गेले, दोन दिल्लीत गेले
हिशोब करतो आहे आता,  किती पैसे भुरर्कन उडाले 

शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली
मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली

जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच  गहाण राहिले
कधी झेंडा  उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले

दरवेळी बंडखोर वळविले असे नाही; पण असेही क्षण आले
तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

भोळ्या जनतेचा  विचार हरघडी केला अन नेता झालो
पडणारी सीट , कशी जिंकून द्यावी , याच निवडणूकीत  शिकलो


झोपडपट्टीतील दादाने इलेक्शनचे धनुष्य  छान पेलले 
दोन दिवस मुंबईत  गेले, दोन दिल्लीत गेले


अमोल केळकर 
४/११/२०१४

Sunday, November 2, 2014

खातं



गृह, उर्जा,  सहकार, आणि अर्थ
कुणीच  नाही खूश , सगळं आहे व्यर्थ 



अमोल केळकर 
३/११/१४

Wednesday, October 29, 2014

शपथविधी


शपथविधी सोहळ्यासाठी 
निमंत्रीतांची मोठी रांग

बहुमत कसे सिध्द होणार 
ते तरी आधी सांग …… 


अमोल केळकर 
३०/१०/१४

माफी नम :



दोन चार मंत्रीपद 
  आहेत तुम्हाला काफी 
 मंत्रीमंडळात  यायचे असेल तर 
   मागावी लागेल माफी ……. 

अमोल केळकर 
२९/१०/२०१४

Wednesday, October 1, 2014

स्वच्छता अभियान




स्वच्छतेच्या गरजेपोटी, 
नेत्यांनीही  घेतला झाडू 

जो करणार नाही काम त्यांना'
निवडणूकीत आम्ही पाडू 

अमोल केळकर 
२ ऑक्टोबर , २०१४

ढग आणि वीज


परत जाणा-या पावसाने 
ढगांशी मोडला करार 
रागावून मग गानेही 
गडगडाट केला फार 

कडकडणारी वीज 
ढगांना जाऊन मिळाली 
न्यूज चेनेलनाही मग 
नवीन युती कळाली 

अमोल केळकर
 १ओक्टोंबर  २०१४


Tuesday, September 30, 2014

मोठा भाऊ


पडीक जागेच्या  वादावरून 
भलतेच  झाले युध्द
आता वाटते कुणालाच 
नव्हती तेंव्हा शुध्द 

इलेक्शन झाली की सगळ्यांना 
आठवेल मोठा भाऊ 
जो तो लागेल मागे मग 
मी येऊ ? मी येऊ ?

Monday, September 29, 2014

हेतू


दुस-यांच्या युतीबद्दल 
विचारायचा हेतू ..

आणि गोदेच्या काठी  
माझ्यामागे ये तू 

अमोल केळकर
 सप्टेंबर २९, २०१४



Related Posts Plugin for WordPress, Blogger...