नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, October 19, 2016

दिवाळी


चकली म्हणाली चिवड्याला
कसा आहे दिवाळीचा कल
डाळीने गाठलीय शंभरी
याचीच वाटतीय सल

चिवडा म्हणाला उदासपणे
आमच्यासाठी ये दिन अच्छे नही बुरे
चल व्हाट्सप वर मेसेज आलाय
आपले बोलणे पुरे.

करंजी म्हणाली लाडूला
यंदा तरी होणार का भेट
लाडू म्हणाला वेट
ट्राफीक जाम असेल तर
होईल थोडा लेट

किल्ला म्हणाला मावळ्यांना
अंगणात यांच्या आता चार चाकी
तुम्हाला एकटेपणा वाटला
तर सरळ शिवनेरी वर या की

दुकानतल्या कोप-यामधे
सुरु होती घालमेल
मिठाई, कपडे , फटाके
सगळ्यांना करायचा होता इमेल

पण ती हो हो पणती
तीला होता पूर्ण विश्वास
तेवत राहिल परंपरेची ज्योत
जो वर राहिल श्वास

माझा आरोळी - संग्रह






माझा आरोळी - संग्रह 

Thursday, October 13, 2016

माझे विडंबन...


माझे विडंबन पुढे ढकल भावा 
आप्तांना मित्रांना मैत्रीणीना 

आहे आज मज  फेसबुक सोयरा 
न करी  अव्हेरा कायअप्पा 

न करिता लाईक कारे तू पळाला 
तीन चार वेळा  वाच आता 

अम्या म्हणे  जीव होतो कासावीस 
होऊ दे प्रसिद्ध आता तरी 


अमोल
१४/१०/१६

मूळ गाणे
माझे मनोरथ पूर्ण करि देवा ।
केशवा माधवा नारायणा ॥१॥

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा ।
न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥

अनाथांच्या नाथा होशी तूं दयाळा ।
किती वेळोवेळां प्रार्थूं आतां ॥३॥

नामा ह्मणे जीव होतो कासावीस ।
केली तुझी आस आतां बरी ॥४॥


Saturday, October 8, 2016

अनुवादाची दोन दशके


अनुवादाची दोन दशके  - उज्ज्वला केळकर

( ठाणे वैभव - ५ ऑकटोबर  २०१६)


Saturday, September 17, 2016

झिंगाट म्हणजे काय माते?


झिंगाट चा अर्थ काय हे बाप्पानी विचारल्यावर
पार्वती मातेने अनेक ग्रंथ हुडकले, पण उत्तर मिळेना
त्याचवेळी योगायोगाने तिन्ही लोकात लीलया जाणारे नारदमुनी *नारायण, नारायण* करत अवतरले
त्यांनापाहून पार्वती  मातेने बाप्पांचा प्रश्ण नारदमुनींना  ही विचारला. क्षणाचाही ही विलंब न करता त्यांनी पार्वती मातेला सांगितले,  तुम्ही तात्काळ महादेवा कडे जावा. महादेवाच्या गळ्यातील *नागराज* तुम्हाला याचे अचूक उत्तर देतील.

पुढे काय झालं..?


नागराजांनी मंजूळ वाणीतून कोणता रहस्य भेद केला, याच उत्तर आम्ही देणार आहोत


२ आँक्टोंबरला..।



Thursday, September 15, 2016

वेल इनिंग कर ...


शिटी वाजली , शाखा सुटली  अन गोव्यात आला  ज्वर 
 अरे जरा  जपून  ध्वज धर ,  अरे जरा  जपून  ध्वज धर 


Tuesday, September 13, 2016

सैराट झाल z ( झी)


दोन आँक्टोबरला सगळे
सात च्या आत घरात
कारण टी व्ही  वर येणार
झींग झिंग करत सैराट

अख्खा भारत असेल
साजरा करत डे- ड्राय
पण झिंगाट झाल्यावर सगळे
आपण तरी करणार काय?

वा जी ( Z) 


Friday, September 9, 2016

शर्मा के बोल


राजाच्या दरबारात  नो अपील 
कळतंय का तुला काही कपील ?



न शर्मा के तुम  बोल देता खूप 
बाद मे तुमको ही रहना  पडता चूप 




# कपिल शर्मा 

Thursday, September 1, 2016

वाचन कप्पा : - संवेदना



( उज्ज्वला केळकर   यांचा  अनुवादित कथा संग्रह  )

पुस्तक परीक्षण -  महाराष्ट्र टाइम्स - १ सप्टेंबर


Tuesday, August 30, 2016

सगळ्यांनाच द्या की टोल माफी


मुबंई  - पुणे मेगा हायवे  ( एक्स्प्रेस वे )  वरून पुण्यापर्यत गेल्यानंतर   कोकण , गोव्या बरोबरच  आपल्याला सोलापूर  , बारामती ,  सांगली , सातारा , , कोल्हापूर  ,बेळगाव  , लातूर , नगर  या   ठिकाणी  जाणे सोईचे होते / आपण लवकर जातो 
गणपती उत्सव साजरा करायला  सगळेचजण आपापल्या  गावी जात असताना  केवळ  कोकणात जाणा-या  भाविकांना  टोल  माफी    असे का बरे ?  सगळ्यांनाच द्या की टोल  माफी ..... 

असाच एक मनात आलेला टुकार ई - चार 

!!!!! मोरया  !!!!!!



२०० ची हवा



चला हवा येऊ द्या 

खर म्हणजे  रविवार ( सुट्टी) नंतर येणा-या  सोमवारचे   मनापासून स्वागत  कोणी करत नाही,  मात्र गेली २ एक वर्ष  महाराष्ट्रातील  प्रत्येक घरातील सदस्य ,  सोमवारी येणारी  विनोदी  हवेची  झुळूक  अनुभवण्यासाठी  आठवड्याच्या पहिल्या दिवसाची अगदी कौतुकाने वाट  बघत असतो, आणि तो कार्यक्रम असतो   चला हवा येऊ द्या 

                   याच मालिकेने काल  २०० वा प्रयोग सादर केला 
               डॉ  निलेश  आणि इतर कलाकारांचे  अभिनंदन 


काही वेळा  येथे होणारे विनोद  पांचट , भंपक , कमरेखालचे वगैरे 
आरोप  झाले आणि हे थोडे खरे असले तरी  योग्य वेळी चुका सुधारून  केलेले  बदल , महाराष्ट्र दौरा  सुखावह वाटले . विशेषतः हिंदी सेलेब्रीटीनाही या कार्यक्रमाची दखल घ्यावी लागली हे या कार्यक्रमाचे उत्तुंग यश .... 


२०० व्या भागाच्या निमित्याने अख्खी मराठी फिल्म इंडस्ट्री एकत्र आली आणि  नावाजलेल्या कलाकारांनी  कितीही हवा
 भरण्याचा प्रयत्न केला तरी  मूळ कलाकारांच्या नखाइतकीही सर / सादरीकरणाची सर याना  आली नाही हे इथे आवर्जून सांगतो 

आज  मराठी नाटक / सिनेमा / मालिका याना  एक हक्काचे स्थान  या मालिकेने मिळवून  दिले आहे यात शंका नाही  

परत एकदा या मालिकेला २००० चा टप्पा गाठण्यासाठी शुभेच्छा 

Thursday, August 25, 2016

निषेधांचे थर


कुणाला प्रिय  लोकशाही 
कुणी मानतो   राजेशाही 
सामान्य माणसास याचे 
काहीच देणे  - घेणे  नाही 

 उंचीवर  येते मर्यादा 
वयावरही आली अट 
अनेक जण म्हणाले 
असू दे , चल हट . 

निषेधांचे  एकमेकांवर 
रचले गेले थर 
कुणीच नसते जबाबदार 
काही झाले तर 







Wednesday, August 24, 2016

तस नव्ह




पण 








कुठल्या थरापर्यँत  प्रश्न  न्यायचा  याला काही मर्यादा  ?????????


सर्व  गोवींदा , गोपिका , सर्व मंडळे  , सरकार , आयोजक , समनव्य समिती,  पोलीस , विरोधक , न्याय व्यवस्था , न्यूज  मीडिया , वार्ताहर  आणि अर्थातच साधारण माणूस  यास गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा 

Monday, August 8, 2016

चुकलेला नेम



वा-याने  हलले निशाण

ऐका तिची कहाणी
शोभा करून डे ची
परत  आली शहाणी

खेळ आहे हा

चुकू शकतो नेम
बाकीचे सारे तयार
करायला तुमचा गेम

अमोल ९/८/१६






Sunday, July 31, 2016

पिण्याच्या राशी


'पिणा-यांच्या राशी'


थोडेसेच पिणे का असेना
 आवडीने पिणार मेष..
काही क्षणात ग्लासा मधे
उरणार नाही काहीच शेष ।।१।।

वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे

चिअर्स देत पिऊन जाते..
मिरिंदा कोकाकोला पेयही
अगदी चवीचवीने पिते.. ।।२।।

कधी टाकुनी आईस,

कधी चकणा पुढे काढा..
मिथुनाचे पिणे मधाळ
तर बिडी अर्धवड ओढा.. ।।३।।

'पेय हे एकसत्य' म्हणत

कर्केचे होते पूर्ण पिणे..
बिसलरीच्या बाटली शिवाय
व्यर्थ यांचे सारे जीणे ।।४।।

हार्ड ड्रिंक पिणा-या सिंहेचा

केवढा राजेशाही थाट..
थोड्यामोठ्या पेगांनी मग
यांची  लगेच लागते वाट.. ।।५।।

'कमी-जास्त नाही ना?'

याची उगाच बाळगून भीती..
अल्कोहोलचे प्रमाण पाहून
कन्येची प्यायची नीती.. ।।६।।

रम-व्हस्की-चकण्याबरोबर

पचतील तेवढ्याच बिअर..
अशा संतुलित आहारानंतर
तूळ म्हणते आय एम स्टिल हियर. ।।७।।

कधी काँकटेल मागायचे

हे काही  कळत नाही..
सोडा टाकून नेहमीचेच पिणे
पण वृश्चिकेला सारख रुचत नाही.. ।।८।।

कधी पटपट-झटपट सिप

तर कधी पितात पाणी
धनू घेते ग्लासात बर्फ
पण संधी मिळताच गातात गाणी.. ।।९।।

ना कधी कौतुक

ना कधी नकारघंटा..
गपगुमानं पितो मकर
करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।

ठराविक डोस पिण्याचा

पार्टी असो वा गटारी.
कुंभेची चिकित्सक वृत्ती
काय प्यायचे ठरवते दुपारी . ।।११।।

कधी-कुठेही जमते

मीनेची पिण्याशी गट्टी..
पोटभर पिल्यावरही होतात
'शेवटच्या पेगसाठी हट्टी..

Enjoy गटारी रविवार


Saturday, July 30, 2016

जवळ आलीय गटारी


कविता लिहितोय दुपारी 
जवळ आलीय गटारी 

थोडा आणा चकणा 
नका मारू बकणा 

एक ग्लास बिअर 
चागल चाललंय इयर 

थोडी थोडी वाईन 
एव्हरीथिंग इज फाईन 

थोडीशी चाखा व्हिस्की 
उतारी बोला किस्की 

चवीला घ्या रम 
बसेल लगेच जम 

जपून प्या व्होडका 
डोके दुखेल बर का 

चाखा थोडी जींन 
पिण्यात व्हा लीन 

लांब कशाला  स्कॉच 
आहे कुणाचा वाच 

पेग भरा थोडा 
मित्र असे जोडा 

टुकार जरी कविता 
मला बोलावा  पिता पिता 

टुकार कवी : 

Thursday, July 28, 2016

अटी मान्य केल्या त्याच्या ह्या


काही दिवसा पूर्वी आमच्या अनोख्या whatsapp ग्रुपवर  Admin ने आम्हाला खडे बोल सुनावले  मग काय..... 
  
अटी मान्य केल्या त्याच्या  ह्या

 (चाल :सखी मंद झाल्या तारका,  आता तरी येशील का )
----------------------------------------------------
अटी मान्य केला त्याच्या ह्या, पाठी उभा राहशील का? ॥धृ. ॥

सभासद लागले पाठीशी  आली जशी गटारी ही!
हा दिवस साजरा करूया , चल साथ तू देशील का?

गाडीत आहे इंधन  पण रस्त्यात आहे पोलीस  ही
तू दोनचाकी वाहणारा, सारथी होशिल का?

जे जे हवे ते भोजनी ते सर्व आहे आणले
तरी ही मला पैसे हवे, तू पुर्तता करशील का?

तव स्वाक्षरी घेण्यास ही आला वेटर जर इथे
तू सांग तेव्हा सत्त्वरी , हा अंगठा घेशील का?


--------------------------------------------------------------
मुळ गाणे -

सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? ॥धृ.॥
मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ? ॥१॥

हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ? ॥२॥

जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ? ॥३॥

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ? ॥४॥

Sunday, July 24, 2016

आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना


मध्यंतरी  आमच्या ' टुकार कवितेवर ' काही प्रतिक्रिया  आल्या होत्या . फालतूपणा, वेळ जात नाही बहुतेक  ' रिकामा सुतार '  इ .इ . 
दुर्दैवाने  या सगळ्या प्रतिक्रिया  आमच्या बायकोने वाचलया  आणि .. मग हाय होणार 
परत  एक टुकार विडंबन 

( चाल : आज मी रुसूनी आहे )

आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना
राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना !
केरसुणी मी धरावी, नुसतेच तू बघावे !
मी काम करताना , रोजचेच तू नटावे !
ते काम का करावे, समजूनही कळे ना
दमलो अती श्रमाने, की पाय चालवेना !
ना घेतली विश्रांती, कामात व्यस्त आहे
घरातला नेहमी चा नोकर दूर राहे?
धुणे अटीतटीचे, घासता भांडी संपेना
चुकवीन बायकोला, ऐसी युक्ति मिळे ना !
की सूड घेई काळ, भलता च हा तुरुंग
देण्यास खोल घाव, छळण्यात गुढरंग ?
फसलो असा कसा हा, ते आजला कळेना ?

आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना
राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना !

---------------------------------------
क्रिएटिवीटी  रोज एक 
जरी असेल टुकार अन फेक ---------------------------------------------
मुळ गाणे -
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !
का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !
की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !

Thursday, July 21, 2016

फक्त तू पडू नकोस


काल  सोसायटीतील  बंडू   '  गटारीची  वर्गणी ' मागायला आला आणि त्याला असे  काही  अमोल सल्ले  द्यावे लागले : -

!!  फक्त तू पडू  नकोस !! 

एक पेग संपला तर
त्यात काय एवढं... ?
पुढचाही येईलच की
ही ही नसे थोडं ...
क्वाटर्र मिळेल तुलाही
गटा गटा पिऊ नकोस
गटारी खूप झाल्या आहेत 
फक्त तू पडू  नकोस
           बार रोज उघडतो ,
           रोज नव्या पेयाने
           बंदही केला जातो
           रोज नवीन बिलाने
           खाणे पिणे  रीतच इथली
           हे तू विसरू नकोस
           गटारी खूप झाल्या आहेत 
           फक्त तू पडू  नकोस
झेप तुझ्यावर घेणारे
कितीतरी वेटर आहेत
तुला प्यायला देणारे
किती तरी ग्लास आहेत
अरे आम्हा मित्राना अशावेळी
 दूर तू  लोटू  नकोस
गटारी खूप झाल्या आहेत 
फक्त तू पडू  नकोस 
     
           वाट तुझी लावत असतं
         रोजच कुणीतरी ...
         तुझ्यासाठी रिझर्व असतो  
        बाक तिथला प्रत्येक क्षणी
        त्यासाठी तुला  प्यायचीय
        पण बाटली तू   उघडू नकोस
        गटारी खूप झाल्या आहेत 
        फक्त तू पडू  नकोस

सामर्थ्य आहे पिण्यात तर
चकणा खिशात  घेऊन चल
 सॅलेडला  ठेऊन  बाकी
दोन फिश  खात चल
बिल  तुलाच मिळेल
तेंव्हा मागे वळून बघू नकोस
गटारी खूप झाल्या आहेत 
 फक्त तू पडू  नकोस

-------------------------------------
काव्य रचिली तिथी
आषाढ कृष्ण तृतीया
गटारीच्या आधी
एकदा तरी बसू या

कल्पना : अमोल





Tuesday, July 19, 2016

माझी गुरुपोर्णीमा


कालची गुरुपोर्णीमा मी अशी साजरी केली


अक्षरांना बोलवून घरी
साजरे केले मी गुरूपूजन
शायरी चारोळी कविता लेख
आले होते सगळेचजण

वृत्तांला वाहिले  केशरी गंध
गणाला वाहिले फूल लाल
हे पाहून यमक म्हणाले
मला थोड्या अक्षता तरी घाल

ओळीत होते -हस्व, दीर्घ
शेजारी उभे मात्रा, काना
बाहेर उभ्या वेलांटीला
म्हणले तुम्हीही आत याना

ओळीत गुंफून सगळ्यांना
तयार झाली ही एक  रचना
नका म्हणू सारखे तुम्ही
 तुझ्यासारखे आम्हाला का  सुचेना


शब्दांकन: अमोल केळकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...