क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...
Wednesday, February 22, 2012
Sunday, February 19, 2012
दमलेल्या ( पृथ्वी ) बाबाची कहाणी
मुंबापुरी नगरात वर्दी दिली भारी
आदर्शचा राजा गेला नांदेडच्या वारी
मुंबईतल्या पालिकेवर मारु बघ खेळी
तिजोरीच्या चावीसाठी झुलतोमी उरी
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....
मंत्रालयात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके युत्या - आघाड्या करून
तास तास जातो पास टेंडर करुन
एक एक मंत्री जातो फाईली ठेऊन
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे !
यमुनेचे पाणी सर्व चहुकडे दाटे !
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....
( गद्य)
गल्ली बोळात लुकलुकणारा माझाच तो ' हात '
आणि पहिल्यांदाच जेंव्हा केला ' इंजीनाने' घात
' बाई' म्हणाली होती जा मुंबईला बदली बाबा
रांगत रांगत जेंव्हा घेतला होता ' घड्याळाने' ताबा
टिक-टिक करत घडाळ्याने टाकल पाऊल पुढलं
गजरच एकत राहिलो फक्त, उठायचंच राहिलं
( पद्य )
आज गेलो आहे आता पुरा अडकून
दचकून जगा होतो ' धनुष्य' पाहून
असा कसा कृपा 'शंकर 'उमेदवार देतो
नातेवाइक म्हणतो आणि तिकिट मागतो
मंत्रिपद गेले आता माझ्या 'हातातून'
उरे काय मला आता मुंबईमधून
जरी होते ओठी मा़झ्या ' बाणासाठी ' हसे
नजरेत मला आता भगवाच दिसे
तुझ्या मुंबईतून 'सेना ' हरवेल का गं
कधीतरी ' हात ' तुला आठवेल का गं
'नवी दिल्ली' जाण्यासाठी उभा रांगे मध्ये
माझ्यासाठी येईल का ' सत्ता ' मुंबईमध्ये
( मुंबईकर एका सुरात )
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....
अमोल केळकर
२०/०२/१२
Monday, February 13, 2012
Tuesday, January 31, 2012
Friday, January 27, 2012
प्रगती
प्रगती झाली संघाची !
पाचव्या दिवशी खेळणार आहे !
बाराच्या भावात जाता जाता !
लाज थोडिशी वाचणार आहे !!
पाचव्या दिवशी खेळणार आहे !
बाराच्या भावात जाता जाता !
लाज थोडिशी वाचणार आहे !!
Friday, January 20, 2012
Thursday, January 19, 2012
Wednesday, January 18, 2012
Monday, January 16, 2012
Saturday, January 14, 2012
तात्काळ सेवा
' तात्काळ सेवेचा' लाभ आता !
मंदिरातही घेता येतो !
शंभराच्या पावतीत !
हवा तसा प्रवेश मिळतो !!
मंदिरातही घेता येतो !
शंभराच्या पावतीत !
हवा तसा प्रवेश मिळतो !!
Monday, January 9, 2012
हती आणि माया
जनतेला हताशी धरून
माया साठवायची
अन
निवडणुक लागली की
तिलाच झाकायची
सध्या तरी आता
पुतळा झाकायला हवा
हत्ती एवढ्या मायेला
संहीतेचा आधार हवा
माया साठवायची
अन
निवडणुक लागली की
तिलाच झाकायची
सध्या तरी आता
पुतळा झाकायला हवा
हत्ती एवढ्या मायेला
संहीतेचा आधार हवा
Wednesday, December 28, 2011
टाईमपास बकवास ( ३ ) - खेळपट्टी
राज्यसभेच्या खेळपट्टीवर
लोकपालचा चेंडू वळणार !
'उदो उदो' करणारेच मग
'हात' आखडता घेणार !!
Monday, December 26, 2011
Saturday, December 24, 2011
डर्टी'
निवड झाली थर्टीफस्टला !
'विद्या' प्रशाला जागेची !
डिमांड आली लोकांमधून !
' डर्टी' पिक्चर बघण्याची !!
संस्थेने केला ठराव !
इमारतनिधी घेऊ !
फारतर सगळ्यांना
फुकट चकणा देऊ !!
'विद्या' प्रशाला जागेची !
डिमांड आली लोकांमधून !
' डर्टी' पिक्चर बघण्याची !!
संस्थेने केला ठराव !
इमारतनिधी घेऊ !
फारतर सगळ्यांना
फुकट चकणा देऊ !!
Thursday, December 22, 2011
टाईमपास बकवास (२) - चिकनी चमेली
' कैफ ' चढला कोंबडीला
चिकनी चमेली पाहून
तडक पळाली मुंबईला
तंगडीत चप्पल धरुन
अब्रूचे झाले नुकसान
दावा कोंबडीने ठोकला
कोंबडाही मग सरळ
उपोषणास बसला.
अमोल केळकर
२३/१२/ २०११
चिकनी चमेली पाहून
तडक पळाली मुंबईला
तंगडीत चप्पल धरुन
अब्रूचे झाले नुकसान
दावा कोंबडीने ठोकला
कोंबडाही मग सरळ
उपोषणास बसला.
अमोल केळकर
२३/१२/ २०११
Wednesday, December 21, 2011
टाईम पास - बकवास (१)
ग्लुकॉन डी पिऊन कोल्ह्याने
घेतला चावा लेखकाचा
जन्म झाला त्याचवेळी
कोलावरी डी गाण्याचा
Tuesday, December 20, 2011
सिमा - वाद
कोल्हापुरी मिसळ, बेळगावचा कुंदा !!
दोन्ही गोष्टी एकत्र खायचा
झालाय मोठा वांदा !!
एकत्र येण्यासाठी आता
समिती नेमावी लागेल !
इकडून तिकडे जाण्यासाठीही
पासपोर्ट काढावा लागेल !!
दोन्ही गोष्टी एकत्र खायचा
झालाय मोठा वांदा !!
एकत्र येण्यासाठी आता
समिती नेमावी लागेल !
इकडून तिकडे जाण्यासाठीही
पासपोर्ट काढावा लागेल !!
Monday, November 21, 2011
१०० नंबरी
फिकी आहेत तुझ्यापुढे
शंभर नाणी सोन्याची !
होऊदेत नांदी आता
शंभराव्या शतकाची !!
सचिनला घरच्या मैदानावर १०० वे शतक झळकवण्यासाठी हार्दीक शुभेच्छा!!
Saturday, November 19, 2011
Subscribe to:
Posts (Atom)










