नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, July 31, 2012

पावसाळी वाहन




  तूला येण्यासाठी होते वाहन
   घोडा, मोर , बेडुक , म्हैस
   आवडले नव्हते   हे तर
   एकदा तरी सांगायचे नाहीस?

    आला  आहेस आता तेंव्हा
    येऊ देत ' सरीवर सरी '
    बदल्यात देऊ नवे वाहन
     नवी कोरी '  शिवनेरी '
 

Wednesday, July 25, 2012

२६ जुलै




आजचा दिवस आला की
पाऊस ही जातो भांबावून
खुप प्रयत्नाने सावरतोय
ओघळणारे अश्रू सकाळपासून

त्या दिवसापासून खरं
विसरलाय तो  बरसणे
आपल्या हातात आता फक्त
गाढवाचे लग्न लावणे !

अमोल केळकर
२६ जुलै २०१२

Saturday, July 21, 2012

श्रावण ...


श्रावण ...


तुझ्या न येण्याच्या निर्णयाने
 आधीच पडलेत खुप व्रण
 आता काय फरक पडतोय
 आला जरी  श्रावण

अमोल केळकर ,
जुलै २१, २०१२

 

Friday, July 20, 2012

एक नंबरी पद



एका  पेक्षा दोन  मोठा
यात आहे साहेबांचे  गुपीत
यावरुन तर ठरणार आहे
राजकारणाचे पुढचे गणित

एक वर जाण्यासाठी
साहेबांचे गणित आहे पक्के
पण मतदानाला पडतील का
घड्याळावरती जोरदार शिक्के ?

अमोल केळकर
जुलै २१, २०१२




Monday, July 16, 2012

कृत्रीम पाऊस





घोटाळ्यांच्या पावसामधे
खरा पाऊस गायब होतो
कृत्रीम पावसासाठी मग
एक घोटाळा रूजू लागतो

Thursday, July 12, 2012

गुटखा बंदी




पुडी प्रमाणे कायद्यातही
एक फट ठेवली जाते
त्याचाच उपयोग करुन मग
दोघांनाही फोडले जाते

जनतेला खुष करण्यासाठी
तोच कायदा परत येतो
तोंडात बकाणा भरता भरताच
ठराव संमत केला जातो

अमोल केळकर
जुलै १३, २०१२

Sunday, July 8, 2012

फूल



दरवळणा-या सुगंधात
मन माझं फसतं
दर वेळेला ते फूल मग
मला पाहून हसतं

अमोल केळकर
जुलै ९, २०१२

Thursday, July 5, 2012

देवकण


 चराचरात कणाकणात
 देव आम्ही पहातो
 दुनियेच्या हाती फक्त
 'देवकण' लागतो.


अमोल केळकर

जुलै६, २०१२
(संकष्टी चतुर्थी )

Thursday, June 28, 2012

नोंद


तूझ्या प्रतेक गोष्टीची नोंद
ठेवली होती त्याकाळी
हेच तर काम होतं मला
रोज उठल्यावर सकाळी

अमोल केळकर
जून २८,२०१२

Wednesday, June 27, 2012

पाऊस


ढगांची झाली गर्दी
हवामान खाते जागे झाले
पडणा-या
प्रत्येक सरीने
आडाखे यांचे बदलू लागले

 चोवीस तासाचा अंदाज
 काही तासात बदलतो
 सूर्यदेवही  या खेळात
 आपला डाव घेऊन जातो.

Tuesday, June 26, 2012

आठवण


  दररोज तुझ्या आठवणीत
  मन माझं रमतं
 चार ओळींनाही लगेचच
 आयतं काम मिळतं

अमोल केळकर

जून २७, २०१२

Monday, June 25, 2012

चूर्ण


तूझ्या शिवाय माझी चारोळी
कधीच होत नाही पूर्ण

.
.
.
.
.
.
.
.
पचत नसेल ज्यांना हे त्यांनी
रोज घ्यावे धौती योग चूर्ण

Sunday, June 24, 2012

वेळेचे गणीत



परत येणार असतानाही
मागे वळून  बघतेस जाताना
मग उगाचच दमछाक होते माझी
वेळेचे गणीत मांडताना

अमोल केळकर

जून २५, २०१२

Friday, June 22, 2012

धग


ढग होते साक्षीला
बाबांनी जेंव्हा पकडले
आठवत नाही त्यावेळी
कोण जास्त बरसले

अमोल केळकर
२३ जून २०१२

बॅकप


मनातल्या फाईलीत
सेव्ह कर शब्दांना
त्यानेच बनव चारोळी
विकली बॅकप घेताना

Thursday, June 21, 2012

आग


 'जातीने ' लक्ष  घालून !
 आग अटोक्यात आणली !
 जातीच्या राजकारणासाठी !
 हळूच जपून ठेवली !!!


नार्को टेस्ट



मला अजिबात आवडत नाही
तुझ्याशी खोटं बोलायला
.
.
.
.
.
.
.
.
.



पैसे ही आज काल फार घेतात
 नार्को टेस्ट  करायला

Wednesday, June 20, 2012

मान - अपमान


मान्य करतो एक गोष्ट
तेवढी उंची आमची नाही
म्हणून काय कधीच आम्ही
चारोळी करायची नाही ????


मान्यता मिळाली नाही तरी
मान आम्ही नेहमीच राखतो
मानापमानाच्या नाटकात
बळीचा बकरा आमचाच जातो.

चारोळी


चारोळी करायचे
चार ओळींनी ठरवले
ऒंजळभरुन शब्द लगेच
मदतीला धावले.

Tuesday, June 19, 2012

वेळ


 तू येणार असलीस की
मी कुणालाही थांबवत नाही
वेळ मात्र अशावेळीही
जायचे नाव घेत  नाही 


अमोल केळकर
२० जून २०१२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...