दर शनिवारी सांगली आकाशवाणीवर हमखास लागणारे गाणे असायचे
" अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान , एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान "
सध्द्याच्या या व्हाट्सअप युगात आम्ही हेच गाणे असे गुणगुणतो
हे व्हाटसपच्या दुता, तुला गृपचं वरदान
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन !!
दाही दिशा तुझे भक्त, करुनी मुक्काम
नुकताची पार केला आकडा शंभर
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन !!
नुकताची पार केला आकडा शंभर
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन !!
विडंबन, विनोद, काव्य आणी चर्चा
साद -प्रतिसादांचारे जोरदार दणका
विचार मांडू सारे, घेऊनी 'गमभन' !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन !!
साद -प्रतिसादांचारे जोरदार दणका
विचार मांडू सारे, घेऊनी 'गमभन' !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन !!
आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा
तुझ्यापरी नावाचा रे राहील दरारा
पाहुणेही येती, गाती तुझे गुणगान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन !!
तुझ्यापरी नावाचा रे राहील दरारा
पाहुणेही येती, गाती तुझे गुणगान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन !!
धन्य तुझे सारे धागे , धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे, तुच आमचा ठेवा
घे उंचावुनी आता, या आपुल्या ग्रुपची शान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन !!
तुझे भक्त आम्ही सारे, तुच आमचा ठेवा
घे उंचावुनी आता, या आपुल्या ग्रुपची शान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन !!
लिंबु , मिरची अन् काकडी जय बोला ऍड$मीन राव की !!
लिंबु , मिरची अन् काकडी जय बोला ऍड$मीन राव की !!
No comments:
Post a Comment