सुवासिनी सिनेमातलील, केदार रागातील हे मुळ गाणे
हेच गाणे कमळाबाई 🌷 आपल्या लाडक्या बाणाला 🏹कशी म्हणेल बघा..
( निव्वळ काल्पनिक, साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा)
---------------------------------------------
आचारसंहिता येऊ लागली,
चल लवकर भेटू
'जिवलगा' कधी रे येशील तू...🌷🏹
'शरद' शोभा आता गेली
'वंचित'गंधा फुलली सुकली
'चंद्रकांते'सह वाढवून ठेविले अंतरिचे हेतू
'जिवलगा' कधी रे येशील तू 🌷🏹
'घड्याळी' या नुरली हिरवळ
फकीर 'हात' हा अवघा दुर्बळ
पुन्हा 'युतीचा' दिसू लागला 'सत्तांकित' सेतू
'जिवलगा' कधी रे येधील तू 🌷🏹
पुनरपि 'इले -क्षण' आलेली
'विधान-सभा' पुनरपि आली
पुनश्च 'वर्षा' लावी आकडे 'मातोश्रीवर' ओतू (२८८)
'भांडखोरा' कधी रे येशील तू 😛
📝१५/९/१९
poetrymazi.blogspot.in
# तुझं माझं जमेना परि तुझ्याशिवाय करमेना 🤪
No comments:
Post a Comment