छोटे बिल्डर 'प्रणव केळकर' अर्थात आमचे चिरंजीव यांच्या कलाकृतीला समर्पित
( मुळ गाणे : असावा सुंदर चाॅकलेटचा बंगला)
असावा सुंदर पत्यांचा बंगला
राजवाडा जणू शोभतोय चांगला
पत्याच्या बंगल्याला भिंतीचा आधार
बांधकाम करताना जपावे लागते फार
तिरप्याशा पानांचा बनवला कोन
हॅलो , ओ तिकडून जाऊ नका कोण
आडवी पाने टाकून स्लॅब छानदार
लवकरच बंगला हा आमचा पहाल
पानाच्या भिंती मधे गुलाम दिसतो
समोरच्या सत्तीशी 'गुलामचोर' खेळतो
उंच उंच पत्यांचा बंगला बनला
ताईने पंखा लगेच लावला
धपकन कोसळला पत्यांचा बंगला
उद्या परत बनवू यापेक्षा चांगला
📝अमोल केळकर
poetrymazi.blogspot.com
२९/०८/२०२०
No comments:
Post a Comment