संदीप खरेंची माफी मागून
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही
उगाच दाखले 'अस्मितेचे' देत रहा तू
फिरेल जेंव्हा 'बुलडोझर' तर बोलू काही
चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…
'सामना' पाहून पारावर कुजबुजला पो-या
'वाट लागू दे' त्याची नंतर बोलू काही
चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…
हवे हवेसे 'अच्छे दिन' जर हवेच आहे
नको नकोसे ' बुरे टोमणे' टाळू काही
चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…
निवडणूकीची किती काळजी बघ पक्षातून
जेंव्हा येईल तेंव्हाच नंतर बोलू काही
चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…
'मिडीया' असुदे हातामध्ये काठी म्हणुनी
'न्यूज' आंधळी 'ब्रेकींग' गडबड बोलू काही
चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…
📝अमोल
१०/०९/२०
******
No comments:
Post a Comment