रविवारची 'टवाळखोरी' 📝
माझी रेसीपी मलाच फाॅर्वर्ड झालीय..
मंडळी नमस्कार 🙏
तुमच्या पैकी अनेकांनी वरचे वाक्य असलेली जहिरात पाहिली असेल.
आपण लिहून पाठवलेली एक रेसिपी व्हायरल होऊन परत आपल्याला कडे येते, हे जिला सर्वप्रथम ही रेसिपी पाठवली तिला सांगताना काकूंना होणारा आनंद अगदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय.
असा अनुभव आज अगदी कुणालाही येऊ शकतो. सध्याच्या 'सोशल युगात' तत्पर फिडबॅक मिळण्याचा एक नवीन प्रकार आहे हा असं मला वाटते.
आज एखादी नवीन माहिती, नविन विचार, विनोद, मिम्स,राजकीय विश्लेषण, संदर्भ, कला, लेख, एखादे गाणे सोशल मिडीयावर शेअर केले जाते. त्यातील आवडलेली माहिती/ पोस्ट पुढे ढकलली जाते ( कधी मुळ कर्त्याचे नाव ठेऊन/ काढून/बदलून). आणि अशाप्रकारे आपण त्या पोस्ट कर्त्याचे एक प्रकारे कौतुकच करतो.
पूर्वी लेखन हे प्रामुख्याने पुस्तक/ कादंबरी रुपात वाचायला मिळायचे. वाचनालय ही हक्काची ठिकाणे असायची. दिवाळी अंक/ पाक्षिक / मासिक यातून ही अनेक लेखक भेटायचे. त्यानंतर अनेकजण रविवारच्या वृत्तपत्र पुरवण्यातून भेटावयास येऊ लागले. इंटरनेट माध्यमातून मात्र लेखक/ वाचक यांच्यातील अंतर कमी झाले. प्रत्यक्ष भेटून अभिप्राय देता नाही आला तरी विविध संकेतस्थळे, त्यांचे ब्लाॅग, यूट्यूब चँनेल्स आणि आता व्हाटसप/फेसबुक पेज इ माध्यमातून हे सगळे कलाकार प्रत्येकाच्या अगदी खूप जवळ आलेत. त्यांना प्रतिक्रिया देणे ही सोपे झाले आहे.
याच माध्यमामुळे अनेक वेगवेगळे लेखक/ कलाकारांची माहिती झाली. छापील माध्यमातून पेक्षा आँनलाईन लेखक म्हणून अनेकांना ओळख मिळाली, अनेकजण प्रसिद्ध झाले. आणि जेंव्हा अशी त्यांची निर्मिती / रेसिपी जेंव्हा त्यांची त्यांनाच परत फॅार्वर्ड होऊन परत येऊ लागली ती त्यांच्या त्या लेखनाची यशाची पावतीच म्हणावी लागेल.
माणूस जसं प्रारब्ध घेऊन येतो तसे काही लेख/ कथा / विनोद/ मीम्स / कलाकृती या ही प्रारब्ध घेऊन येतात. कुणाच्या नशिबात केंव्हा 'व्हायरल' व्हायचा योग येईल हे त्या कर्त्याला ही सांगता येणार नाही.
माझ्या सुदैवाने गेल्या १०-१२ वर्षात काही लेख याबाबतीत सुदैवी ठरले मग तो 'भाईं' वरचा लेख असेल किंवा संकष्टीच्या आधी ' साबुदाणा भिजवण्याचा ' निरोप असेल किंवा मग ' शेपटीवाल्या प्राण्यांचे ' विडंबन गीत असेल.
अगदी त्या काकूंना झालेला आनंद प्रत्यक्ष अनुभवलाय. मीच नाही तर अगदी अनेकांनी.
तेंव्हा 'रेसिपी' बनवत रहा.
मंडळी थोडंसं तत्वज्ञान सांगून माझी टवाळखोरी थांबवतोय.
" माझी रेसीपी म्हणजे माझे कर्म ( नेहमी) मलाच फाॅर्वर्ड होत असते "
समझनेवालों को....
अमोल केळकर
०६/१२/२०२०
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment