https://youtu.be/CKHuPscOLo4
पंडीत कुमार गंधर्व यांचा आज जन्मदिन ( ८/४ ). या शुभमुहूर्तावर आज आम्ही 'टोचून' घ्यायला गेलो. १५ वा नंबर. मग काय इतरांना टोचू म्हणलं तोपर्यंत 😷
ऋणानुबंधाच्या
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
'लसीत' टूच्चता मोठी
लसीत' टूच्चता मोठी 💉
त्या 'फोरनून' वेळा थरथरती कधी अधरी
त्या विलगी रहाण्याच्या आठवणी त्या प्रहरी
कितीदा झालो, गेलो ,वाचलो
घेण्यावाचुनी लसिकरणाच्या कधी न घडल्या गोष्टी
लसीत' टूच्चता मोठी
लस तिने भरुनच घेणे
टोचल्यावर उगीचच हसणे
नंतर ते मनोमन बसणे
टोचणे- बसणे , बसणे-टोचणे
दंडावरी राहण्यासाठी जन्मजन्मीच्या गाठी
लसीत' टूच्चता मोठी
कधी घरात दु:खाने बसलो
दु:खात सुखाला हसलो
कधी गहिवरलो कधी धुसफुसलो
लाँकडाऊनच्या आठवणीनी हृदयात मारल्या रेघा
जन्मासाठी जन्म जन्मलो, करोना शी करु या कट्टी
लसीत' टूच्चता मोठी
//
💉 💪🏻
इथे विसावली लस - पुर्वार्ध ✌🏻
( लसीभूत ) ☺️ अमोल
०८/०४/२१
No comments:
Post a Comment