अनेक वर्षे मार्केटिंग मधे काम करणाऱ्या आम्हाला ही परिस्थिती नवीन नाही
'कस्टमर' ( रशिया ) - timely shipments, shipment quantity, गुणवत्ता, ,पेमेंट क्रेडीट, ट्रान्सपोर्टर इ इ मिसाईल्स 🚀
मॅनेजमेंट ( NATO) - घ्या रे आँर्डर आम्ही आहोत. करु व्यवस्थित सगळं,
सेल्स मॅन ( युक्रेन) - नाही साहेब बघताय ना परिस्थिती, लाॅकडाऊन, सुट्या, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव, युध्द, पुढल्यावेळेला आधीच देतो साहेब, बस का साहेब !आत्तापर्यंत असं झालं का? , लागून सुट्ट्या आल्या ना, सर्व्हर डाऊन होता ना, दोन दिवस SAP प्राँब्लेम होता, अहो शनिवारीच मी डिओ ( DO) देऊन ठेवलेला तुमच्या माणसानं घेतला नाही तर आम्ही काय करणार ?, थोडं तरी पेमेंट करा ना मग मॅनेजमेंट ला सांगता येईल, नक्की साहेब, होय साहेब, राॅ मटेरियल किती वाढलय बघताय ना? आम्ही मार्जीन काहीच ठेवले नाही आहे यावेळेला सर, ट्रान्सपोर्ट चा स्ट्राईक नव्हता का? डाॅलर चा रेट बघा की साहेब, तुम्ही काळजी करु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हीच तर आमचे टाॅप कस्टमर आहात की
साहेब, मार्च महिना आलाय शेवटचा महिना, नवीन 'परचेस आँर्डर ' ( PO) उद्या पर्यंत पाठवाल ना? मी प्रोसेस चालू करतोय, याच महिन्यात शिप करतो.
टार्गेटच्या जरा जवळ तरी जाऊ
काय पण होऊ दे 'झुकेगा नही' अँडीट्युड असणाऱ्या आणि ' इयर एन्ड टार्गेट' साठी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या परिस्थितीतून जाणाऱ्या सर्व लेवल वरच्या सेल्समॅन/ सेल्स गर्ल्सना समर्पित 👩🏼💼👨🏻💼🙏💐
( साधा विक्रेता ) अमोल 📝🏃🏻♂️
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment