मुळ गाणे: " दिस चार झाले मन, पाखरू होऊन"
( चित्रपट: आईशप्पथ, गीत: सौमित्र, स्वर : साधना सरगम, संगीत: अशोक पत्की )
आमचे गाणे📝 :👇🏻
दिस चार झाले बंड, हो गुहाटी जाऊन
बाण बाण आर्त आज धनु ष्या(सा)वरुन 🏹
संज्यावेळी जेंव्हा येई आठव आठव
दूर तिथे ' मातोश्रीत ' होई 'घंटा'रव
उभा घडाळ्याचा राही, काटा वेळ पाहून
(दिस चार झाले बंड, हो गुहाटी जाऊन)
नकळत आठवणी जसे विसरले
'ठाणे'वर इथे तसे ठसे उमटले
मस्त झाडे- डोंगर , हाटीलात राहून 🏕️
(दिस चार झाले बंड, हो गुहाटी जाऊन)
झाला जसा शिडकावा 'इडी' पावसाचा
प्रवेश झाला इकडे एक एक आमदाराचा
'वर्षा'व सुखाचा इथला गेला ओसरून
दिस चार झाले बंड,हो गुहाटी जाऊन
बाण बाण आर्त आज धनु ष्या(सा)वरुन 🏹
( विडंबनासाठी नेहमीच रिचेबल )
अमोल 📝
२६/०६/२२
1 comment:
खूपच मस्त लिहिले आहे
Post a Comment