नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, July 23, 2024

नोकरदार भुलला


 ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून, निर्मलादेवी चरणी अर्पण 

🙏🌸


नोकरदार भुलला

नोकरदार भुलला

टँक्स मोजिता करु,खुळीयासी झाला


नोकरदार भुलला

नोकरदार भुलला


इतुकेसे स्लँब, फेकियले स्वारी

तयाचा भरणा, गेला गगनावरी


नोकरदार भुलला

नोकरदार भुलला


पगाराची पुंजी,गुंतविला झोला

माय 'निर्मलादेवीवरी' इन्क्कम अर्पिला


नोकरदार भुलला

नोकरदार भुलला


आषाढी संकष्टी चतुर्थी

२४/०७/२४

#माझी_टवाळखोरी 📝

Friday, July 19, 2024

क्लाऊड' चुकीचा ठरतो


 

मुळ कविता ; पाऊस कधीचा पडतो


विडंबन :- अर्थात #माझी_टवाळखोरी  📝 

( कवी ग्रेस यांना स्मरून 🙏)


'क्लाऊड' चुकीचा ठरतो

'मायक्रोची' फेल बटणे 

बोंबाबोब 'हार्ड' झाली

'विंडोजच्या' निळ्या धुराने


डोळ्यात उतरले पाणी

'सर्व्हरचे' डोके फिरती

'आय-टी' चा चढला पारा

आज आपुल्या  धरणीवरती


'रिस्टार्ट' कसे होईना?

'सिस्टीम' वर पडला घाला

सा-यांचा जमिनीवरती

प्रवास असा अडखडला


संदिग्ध 'प्रोग्रँम'च्या ओळी

'बायनेरी' कोड सारा

अशाच घटनांवरती

शनीचा वक्री पहारा


शनिवार

आषाढ शु.चतुर्दशी

२०/७/२४


#माझी_टवाळखोरी 📝

Wednesday, July 10, 2024

हवामान खात्याचे आभार


 हवामान खात्याचे मी एका गोष्टीसाठी अत्यंत आभार मानू इच्छितो. त्यांनी जर परवा ' रेड अलर्ट' वगैरे दिला नसता तर ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नसती.


तर गोष्ट अशी की त्या अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे आम्ही सकाळी आँफीसला निघताना जास्त सुरक्षितता असावी म्हणून  छत्रीसह फूल रेनकोट घालून निघालो. अर्थात हवामानखात्याच्या भकितांचा अनुभव गाठीशी असल्याने लोकलला खच्चून गर्दी होतीच. नेहमीप्रमाणे डब्यात शिरून दोन पायावर स्थिरस्थावर झाल्यावर आपसूक हात मोबाईल कडे गेले. पण मोबाईल मुळ विजारीच्या कप्प्यात आणि त्यावर रेनकोटची विजार असल्याने मोबाईल काढता आला नाही.


" अशारितीने आमचा लोकल मधील प्रवास ब-याच दिवसानी खिडकीतून बाहेरचं बघण्यात  गेला. "


( याठिकाणी एक गोष्ट नमूद करु इच्छितो की सामान्य लोकलवासी मुंबईकरांना खिडकीच्या बाहेरही न बघता, स्वत:च्या मोबाईल मधे पूर्ण वेळ व्यस्त असतानाही आपले स्टेशन केंव्हा येणार,जागेवरून दरवाज्याकडे केंव्हा जायचे याचा 'सेन्स' बरोबर असतो)


यातून एक गोष्ट मात्र लक्षात आली की मोबाईल, पाकिट लोकलच्या गर्दीत मारले जाऊ नये म्हणून हा वेश उत्तम


आणि म्हणून सूर्य नारायण दर्शन देत असताना, अंगातून घामाच्या धारा वहात असताना वरचा रेनकोटचा कोट न घालता फक्त विजार घालून जायचा धाडसी निर्णय ( किमान पावसाळा संपेपर्यत)  घेतला आहे.


आता विरारपर्यंत फास्ट असो वा खोपोली फास्ट आपला खिसा कायम सेफ आणि तेवढ्यापुरते सोशल मिडीयावरुन सुट्टी


ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल हवामान खात्याचे परत एकदा आभार


आषाढ शु. पंचमी

११/०७/२४

#माझी_टवाळखोरी 📝

Saturday, July 6, 2024

कंपनी कल्चर


 


आषाढस्य प्रथम दिवसे


 आषाढस्य प्रथम दिवसे

मेघांनी ठरवलं ब्रेक घ्यायचा

विकेंडला लोणावळा-खंडाळा करुनच

कालिदासांच्या बायकोला निरोप द्यायचा


पुणे- मुंबईकरांसारखेच

आकाश मार्ग करायचा जाम

कालिदास काहीही म्हणोत

निर्णयावर आपण रहायचं ठाम.


#पावसाळा_विकेंड_लोणावळा_शास्त्र

#माझी_टवाळखोरी 📝

आषाढ.शु.प्रतिपदा

Friday, July 5, 2024

मरीन_लाईन्सचा_महापूर


 या विश्वात अगणित आकाशगंगा आहेत. त्यात  आपली आकाशगंगा, मग पृथ्वी, भारत आणि मग आपले गावं त्यात आपणं  म्हणजे  आपण किती लहान आहोत वगैरे आध्यात्मिक प्रवचन ब-याचदा ऐकले आहे

पण त्याचं एक छोटं माॅडेल काल मरीन लाईन्सला प्रत्यक्ष  अनुभवलं.



गर्दी मुंबईकरांना नवी नाही

लोकल रद्द/ उशीरा आल्याने होणारी गर्दी, गणेशोत्सव, दहीहंडी, राजकीय सभा, जयंत्या, अंगारकी, नवरात्रोत्सव, आणि कुठलाही शनिवार-रविवार गर्दी असणार हे गृहीत असतेच

पण कालचा गर्दीचा महापूर मात्र अचंबीत करणारा होता आणि याची चुणूक दादर स्टेशनलाच आली


काल पहिल्यांदाच कदाचित असं झालं असेल की संध्याकाळच्या वेळेला बोरिवली -विरार कडे जाणा-या लोकल पेक्षाही चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल मधे जास्त गर्दी होती

चर्चगेट स्टेशनवरून बाहेर पडायलाच ५  मिनिटे लागली. स्टेशन समोरच्या एका छोट्या गल्लीतून मजल-दलमजल करीत कसंबसं मुख्य रस्त्यापर्यंत येता आलं. 

५ ते ६ रोड शो ची वेळ असताना, साधारण पावणे सहा वाजताही चँम्पीअन्स ना आणणारी बस  उजवीकडे वानखेडेच्या बाजूने, ट्रायडंट कडे मुंगीच्या गतीने जाण्याचा' ट्राय ' करत होती. ही G पासींगची बस तिकडे पोहोचणार मग खेळाडूंना घेणार आणि परत येईपर्यंत आमच्या 'निलांबरीने ( आपली डबलडेकर) सहज २ - ४ फे-या केल्या असत्या हा विचार मनात येऊन गेला 🤪


*या अथांग जनसमुदायाचा भाग बनताना वय्यक्तिक तुम्ही अगदीच 'शून्य' आहात याची जाणीव वेळोवेळी मोबाईल नेटवर्क देत होते*

अगदी हाकेच्या अंतरावर परिजन आहेत पण तुमच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर ( किंवा तुमच्या अवती भवती आहेत तेच सध्या तुमचे परिजन) या वेगळ्या अलिप्तपणाची जाणीव झाली


या सगळ्यात आकाशातील ड्रोन मात्र सुदैवी होते. ही एकमेव गोष्ट पूर्ण मरिन-लाईन्सवर इकडे तिकडे ( वर-खाली ) सहज करु शकत होती 😛


"येतोस का? आम्ही असू तिकडे" असा सकाळी ९:३० ला पुण्याच्या मित्राला दिलेला मेसेज आणि ३:१५ ला त्याचे आणखी एका मित्रासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वर झालेले आगमन,(पण शक्य न झालेली भेट )

#लाडके_मित्र _योजने अंतर्गत, जे असे लाखो फाॅर्वर्ड्स काल दिवसभर ढकलले गेले त्याने 

'न _भूतो_न_भविष्यति!' अशीही परिस्थिती काल मुंबईच्या मरिन लाईन्स वर उद्भवली,

आणि म्हणून 

#लाडके_मित्र_योजना अंमलात आणणा-यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी , अध्यक्ष महोदय   !


#मरीन_लाईन्सचा_महापूर


अमोल

०५/०७/२०२४

माझी_टवाळखोरी 📝

Related Posts Plugin for WordPress, Blogger...