मुळ कविता ; पाऊस कधीचा पडतो
विडंबन :- अर्थात #माझी_टवाळखोरी 📝
( कवी ग्रेस यांना स्मरून 🙏)
'क्लाऊड' चुकीचा ठरतो
'मायक्रोची' फेल बटणे
बोंबाबोब 'हार्ड' झाली
'विंडोजच्या' निळ्या धुराने
डोळ्यात उतरले पाणी
'सर्व्हरचे' डोके फिरती
'आय-टी' चा चढला पारा
आज आपुल्या धरणीवरती
'रिस्टार्ट' कसे होईना?
'सिस्टीम' वर पडला घाला
सा-यांचा जमिनीवरती
प्रवास असा अडखडला
संदिग्ध 'प्रोग्रँम'च्या ओळी
'बायनेरी' कोड सारा
अशाच घटनांवरती
शनीचा वक्री पहारा
शनिवार
आषाढ शु.चतुर्दशी
२०/७/२४
#माझी_टवाळखोरी 📝
No comments:
Post a Comment