नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, July 10, 2024

हवामान खात्याचे आभार


 हवामान खात्याचे मी एका गोष्टीसाठी अत्यंत आभार मानू इच्छितो. त्यांनी जर परवा ' रेड अलर्ट' वगैरे दिला नसता तर ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नसती.


तर गोष्ट अशी की त्या अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे आम्ही सकाळी आँफीसला निघताना जास्त सुरक्षितता असावी म्हणून  छत्रीसह फूल रेनकोट घालून निघालो. अर्थात हवामानखात्याच्या भकितांचा अनुभव गाठीशी असल्याने लोकलला खच्चून गर्दी होतीच. नेहमीप्रमाणे डब्यात शिरून दोन पायावर स्थिरस्थावर झाल्यावर आपसूक हात मोबाईल कडे गेले. पण मोबाईल मुळ विजारीच्या कप्प्यात आणि त्यावर रेनकोटची विजार असल्याने मोबाईल काढता आला नाही.


" अशारितीने आमचा लोकल मधील प्रवास ब-याच दिवसानी खिडकीतून बाहेरचं बघण्यात  गेला. "


( याठिकाणी एक गोष्ट नमूद करु इच्छितो की सामान्य लोकलवासी मुंबईकरांना खिडकीच्या बाहेरही न बघता, स्वत:च्या मोबाईल मधे पूर्ण वेळ व्यस्त असतानाही आपले स्टेशन केंव्हा येणार,जागेवरून दरवाज्याकडे केंव्हा जायचे याचा 'सेन्स' बरोबर असतो)


यातून एक गोष्ट मात्र लक्षात आली की मोबाईल, पाकिट लोकलच्या गर्दीत मारले जाऊ नये म्हणून हा वेश उत्तम


आणि म्हणून सूर्य नारायण दर्शन देत असताना, अंगातून घामाच्या धारा वहात असताना वरचा रेनकोटचा कोट न घालता फक्त विजार घालून जायचा धाडसी निर्णय ( किमान पावसाळा संपेपर्यत)  घेतला आहे.


आता विरारपर्यंत फास्ट असो वा खोपोली फास्ट आपला खिसा कायम सेफ आणि तेवढ्यापुरते सोशल मिडीयावरुन सुट्टी


ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल हवामान खात्याचे परत एकदा आभार


आषाढ शु. पंचमी

११/०७/२४

#माझी_टवाळखोरी 📝

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...