गेले नाही दिवस सोशल मिडीयावर एका चित्रावरून बरीच चर्चा वाचली. अनेकांनी ते चित्र पाहिले असेल, लेख वाचले असतील, अनेकांनी चॅनेलवर ती बातमी पाहिलीही असेल
तर सचिन आणि विनोद या खास मित्रांची,त्यांच्या आचरेकर सरांच्या स्मृतीस्थळा निमित्य कार्यक्रमात झालेली भेट हा विषय.
अनेकांच्या दृष्टिकोनातून सचिन त्याच्या करिअर मधे एकदम यशस्वी
तर विनोद एकदम दुसरं टोक
त्यावर अनेकांनी सांगितलेले/ लिहिलेले तत्वज्ञान. तर मंडळी माझ्याकडून त्यात ४ आणे ची भर
तुमच्या आयुष्यात तुमच्या क्षेत्रात/ जीवनात, विनोद सारखे आयुष्य नको ( शेवटी प्राक्तन)
सचिनसारखे यशस्वी आयुष्य मिळावे या शुभेच्छा ( हे ही सहजा सहजी शक्य नाही, हजारात एखाद्याला सचिन बनता येते, इथेही शेवटी नशीब)
तर मंडळी यातील मधला दुवा बनणे जे जवळ जवळ सगळ्यांना शक्य आहे आणि ती फ्रेम आपण मिस करतोय ( बातम्यात दिसलीय) ते म्हणजे ना विनोद, ना सचिन
आपण आयुष्यात 'प्रवीण आम्रे ' तर नक्कीच बनू शकतो.😁
म्हणलं तर
यशस्वी, म्हणलं तर नाही . फारशी चर्चा नाही. पण त्या फ्रेम मधे उपस्थिती नक्की
करा विचार तुम्ही कोण?
माझी_फुसकुंडी🔥
०८/१२/२४
No comments:
Post a Comment