क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...
Monday, April 30, 2012
Friday, April 27, 2012
( नको देव राया , राज्यसभा पाहू )
आमच्या देवाला , राज्यसभेवर न जाण्यासाठी ही प्रेमळ विनंती :)
नको देव राया , राज्यसभा पाहू
खेळ हा सर्वथा , जाऊ पाहे !
विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे
तूला काय जाहले, अरे देवा !
तुजविण कोण न दिसे संघातुनी !
पळू लागे धोनी, घरीबाई !
निवृतीची आस, दिसते आम्हास !
घेई जहिरात आपुल्या कवेत
--------------------------------------------------------------------------
मुळ गाणे
नको देव राया , राज्यसभा पाहू
खेळ हा सर्वथा , जाऊ पाहे !
विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे
तूला काय जाहले, अरे देवा !
तुजविण कोण न दिसे संघातुनी !
पळू लागे धोनी, घरीबाई !
निवृतीची आस, दिसते आम्हास !
घेई जहिरात आपुल्या कवेत
--------------------------------------------------------------------------
मुळ गाणे
नको देवराया अंत आता पाहू | |||||
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे | |||||
हिरणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले | |||||
मजलागी जाहले तैसे देवा | |||||
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी | |||||
धावे हो जननी विठाबाई | |||||
मोकलूनी आस, जाहले उदास | |||||
घेई कान्होपात्रेस हृदयात | - | ||||
रचना - संत कान्होपात्रा
संगीत : आनंदघन
चित्रपट - साधी माणसं
Thursday, April 26, 2012
बोफोर्स
'स्टेनच्या'.तोंडच्या वाफेने !
शिळ्या कढीला ऊत आला !
बोफोर्स तोफेचा गोळाही !
तेच तेच ऐकून विटून गेला !
तडजोडीचे राजकारण !
दलालच करतात फोर्स !
फसला जातो शहनशा !
लोग कहते है ' बोफोर्स ' !
Wednesday, April 25, 2012
Saturday, April 21, 2012
माझीया प्रियाला ......
तुझ्या प्रियाला आधी !
प्रित कळत नव्हती !
असे म्हणतच तू !
त्याच्या मागे होती !
'तू तीथे मी' म्हणत !
हसतेस भलतीच गोड !
आता तरी प्रियाला !
थोड मोकळे सोड !!!
अमोल केळकर
२१/०४/२०१२
Thursday, April 19, 2012
लाईफ लाईन
आज ठरवले आहे!
काही फायदा नाही त्रासून !
बाहेर काढलेय तिला नुकतेच !
अतिदक्षता विभागातून !
जागोजागी स्टेशनात !
उभे माणसांचे थवे !
काही दिवस तरी !
रिक्षाने जायला हवे !
'आदर्श' चोर
अग्नीला साक्षी ठेवून !
इरादे मजबूत करु !
वेळप्रसंही शत्रूला !
पळताभुई थोडी करु !!
प्रश्ण इथे संपले नाहीत !
लढा आपल्याशीच आहे !
'आदर्श' चोरांचा सगळीकडे !
सुळसुळाट माजला आहे !!
Monday, April 16, 2012
Saturday, April 14, 2012
धक्का
बिहार दिनाच्या पुर्वसंधेला !
मुंबईला बसलाय धक्का !
-
-
-
-
-
-
-
-
-
तरीही फडकत राहिल भगवा !
इरादा आमचा पक्का !!
Tuesday, April 10, 2012
श्यामची ( नवीन ) आई
रिमेकच्या जमान्यात !
नवीन आईचा शोध लागला !
गुरुजींचा 'शामही' मग !
भलताच खुश होऊन गेला !! !!
अरीन आणि रायनलाही !
आणखी एक भाऊ मिळाला !
' नेने' बाईंनी जेंव्हा !
' श्यामची आई ' स्विकारला !!
बिहार दिन ---
बिहार दिनच्या सोहळ्यासाठी
मुंबई लागलीय नटायला !
-
-
-
-
-
-
-
शिका महान नेत्यांकडून
खाजवून खरुज काढायला !!
Sunday, April 8, 2012
झर दारी ओझे
रेशमी चादर दर्ग्यावर !
झरदारींनी अर्पीयली !
दहशतीच्या जखमेवरची !
खपली अलगद उडून गेली !!
धार्मीकतेच्या प्रेमापोटी !
शत्रूही मित्र बनत आहे !
खंजीर घुसला पाठीत तरी !
अतिथी आमचा देव आहे !
Saturday, April 7, 2012
बातमी
विसरेपणाचा शाप !
बातमीला असतो !
हेच लक्षात ठेवत !
गुन्हेगार वाढतो !!
चौकी चौकीत फक्त !
ढिग फाईलीचा लागतो !
नवस कुठे फेडायचा !
देवही चोरीला जातो !!
Monday, April 2, 2012
आयपीएल चा खेळ रे.......
आयपीएल चा खेळ रे.......
(चाल - ' विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे !)
=====================
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !
आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !!
आयपीएल चा खेळ रे,--
खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे !
प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----
सर्वांचा हा खेळ रे, मालक स्वयंमेवरे !
प्रीती, शाहरुख, अंबानी , घेती वाटुन संघ रे, !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----
सचिनचा आराम रे, भज्जी करी काम रे !
लुफ्त होई युवाशक्ती , चिअर गर्ल्स पाहून रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----
सामने अनेक रे, बुकी करी फिक्स रे !
टोनी, शास्त्री , अरुणलाल - सांगती आख्यान रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !
आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !!
(चाल - ' विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे !)
=====================
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !
आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !!
आयपीएल चा खेळ रे,--
खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे !
प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----
सर्वांचा हा खेळ रे, मालक स्वयंमेवरे !
प्रीती, शाहरुख, अंबानी , घेती वाटुन संघ रे, !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----
सचिनचा आराम रे, भज्जी करी काम रे !
लुफ्त होई युवाशक्ती , चिअर गर्ल्स पाहून रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----
सामने अनेक रे, बुकी करी फिक्स रे !
टोनी, शास्त्री , अरुणलाल - सांगती आख्यान रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !
आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !!
Subscribe to:
Posts (Atom)