नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, April 27, 2012

( नको देव राया , राज्यसभा पाहू )


आमच्या देवाला , राज्यसभेवर न जाण्यासाठी ही प्रेमळ विनंती  :) 


नको देव राया , राज्यसभा पाहू
खेळ  हा सर्वथा , जाऊ पाहे !

विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे
तूला काय जाहले, अरे देवा !

तुजविण कोण न दिसे संघातुनी !
पळू लागे धोनी, घरीबाई !

निवृतीची आस, दिसते आम्हास !
घेई जहिरात आपुल्या कवेत
--------------------------------------------------------------------------

मुळ गाणे

नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे



हिरणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा



तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई



मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात-




रचना - संत कान्होपात्रा
संगीत : आनंदघन
चित्रपट - साधी माणसं
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...