नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, April 2, 2012

आयपीएल चा खेळ रे.......


आयपीएल चा खेळ रे....... 
(चाल - ' विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे !)
=====================
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !
आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !!
आयपीएल चा खेळ रे,--

खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे !
प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----

सर्वांचा हा खेळ रे, मालक स्वयंमेवरे !
प्रीती, शाहरुख, अंबानी , घेती वाटुन संघ रे, !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----

सचिनचा आराम रे,
भज्जी  करी काम रे !
लुफ्त होई युवाशक्ती , चिअर गर्ल्स पाहून रे !!
आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !----

सामने अनेक रे, बुकी करी फिक्स रे !
टोनी, शास्त्री , अरुणलाल - सांगती आख्यान रे !!

आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !
आनंदाची शाम त्यांची आनंदाची
रात्र रे !!

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...